Alert : या आजारांचा धोका वाढतोय, 'ही' लक्षणं दिसली तर दुर्लक्ष नको

Alert : या आजारांचा धोका वाढतोय, 'ही' लक्षणं दिसली तर दुर्लक्ष नको

डेंग्यू, मलेरिया, फ्लूबरोबरच स्वाईन फ्लूची लागण झालेले रुग्ण वाढल्यामुळे काळजी वाढली आहे. वेळीच उपचार झाले नाहीत, तर स्वाईन फ्लू म्हणजेच H1N1 व्हायरसमुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. कशी ओळखायची या आजारांची लक्षणं?

  • Share this:

मुंबई, 3 ऑगस्ट :  जुलैनंतर आता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे  स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं. राज्यभरात या विषाणूजन्य आजाराचे रुग्ण वाढत आहेत. डेंग्यू, मलेरिया, व्हायरल फ्लूबरोबरच स्वाईन फ्लूची लागण झालेले रुग्ण वाढल्यामुळे काळजी वाढली आहे. वेळीच उपचार झाले नाहीत, तर स्वाईन फ्लू म्हणजेच H1N1 व्हायरसमुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

स्वाईन फ्लू हा विषाणूजन्य आजार असून H1V1 या व्हायरसमुळे होतो, हे आता चांगलंच माहिती आहे. पण या आजाराचं लवकर निदान होत नाही आणि धोका वाढतो. मुंबईत 300 च्या वर स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात नाशिक, पुणे आणि विदर्भातही H1N1 ची लागण झालेले रुग्ण आढळायला लागले आहेत. मुंबईत जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात एका महिलेचा या आजाराने मृत्यू झाला.

हे ही वाचा : Facebook, WhatsApp ची हेरगिरी, 'हे' टूल आहे धोकादायक!

औषधोपचारास विलंब हे एक प्रमुख कारण आढळून येत असून काही रुग्णांनी स्वत: सर्दी, तापावर गोळ्या औषध घेऊन आजार अंगावर काढल्याने गांभीर्य वाढलं.

ही आहेत लक्षणं

सर्दी, खोकला - कफाचं प्रमाण वाढत जातं

ताप - ताप औषध घेऊन उतरतो पण पुन्हा चढतो.

अंगदुखी - सततची अंगदुखी. सांधे जास्त दुखतात.

जुलाब - अन्नावरची वासना उडते, जुलाब आणि उलट्याही होतात

अशक्तपणा - डोळे लाल होतात आणि कमालीचा अशक्तपणा येतो

हे वाचा : पावसाळ्यात 'हे' 5 पदार्थ नक्की खा, चांगले राहील आरोग्य

अशी घ्या काळजी

स्वतःच्या मनाने सर्दी-तापाच्या गोळ्या घेऊ नका. पॅरासिटॅमॉल घेऊन ताप उतरत नसेल तर तातडीने डॉक्टरांना सांगा. डॉक्टरांनी सांगितलेल्या टेस्ट करून घेणं आणि औषधं वेळेवर घेणं आवश्यक आहे. स्वाईन फ्लू मुळे झालेल्या मृत्यूंच्या केसमध्ये ताप येत असेल आणि चार-पाच दिवसांनी गोळ्या घेऊनही प्रकृतीत फरक न पडल्यास त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतल्याचं दिसून येतं.

हे वाचा : तुम्हालाही आहेत का ‘या’ समस्या, साजूक तूप खाणं ठरेल फायद्याचं

पाच- सात दिवस अंगावर काढल्यानंतर आजार बळावतो आणि मग हाताबाहेर जातो. H1N1 साठी आता लससुद्धा मिळते आणि टॅमी फ्लूसारख्या गोळ्याही उपलब्ध असतात. वेळेवर निदान होणं हीच या आजारापासून वाचण्यासाठी आवश्यक आहे. सर्दी, ताप, घसादुखी 48 तासाच्या आत बरी न झाल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने टॅमी फ्लू गोळ्यांचा डोस सुरू करावा. कुठल्याही परिस्थितीत आजार अंगावर काढू नका. मधुमेह, रक्तदाब असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.

हे लक्षात ठेवा

स्वाईन फ्लूचा आजारा हवेतून पसरतो. H1N1 ची लागण झालेल्या रुग्णाला वेगळ्या खोलीत झोपवावे, त्याच्या जवळ जाताना मास्क लावून जावे. रुग्णाचे कपडे, रुमाल वेगळे धुवावेत. वेळेवर खाणं, भरपूर पाणी पिणं आणि औषध घेणं ही रुग्णाची काळजी घ्यावी.

पपई, अॅव्होकॅडो आणि किवी

डेंग्यू, मलेरिया या आजारांमध्ये रुग्णाच्या रक्तातल्या प्लेटिलेट्स कमी होतात. याचा परिणाम प्रतिकार शक्तीवर होतो. प्लेटिलेट्सची संख्या १ लाखांच्या खाली गेली की, रुण्गाला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागू शकतं. काही वेळा बाहेरून रक्त देऊन प्लेटिलेट्स काउंट वाढवावा लागतो. पण निसर्गात असेही काही पदार्थ आहेत, ज्यामुळे प्लेटिलेट्सची संख्या नैसर्गिकरीत्या वाढू शकते. मलेरिया, डेंग्यूच्या साथीमुळे पपई आणि किवी ही फळं खायला हवीत. ड्रॅगन फ्रूट आणि अॅव्होकॅडोमध्येही प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असतात. त्यामुळे या फळांचा आहारात समावेश करायला हवा.

काळीज पिळवटून टाकणारा VIDEO, नदी ओलांडताना क्षणात वाहून गेल्या गायी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 05:14 PM IST

ताज्या बातम्या