News18 Lokmat

प्रक्रिया केलेले पदार्थ खाताय? मग आहे खूपच धोकादायक कारण...

फ्रान्समध्ये केलेल्या अभ्यासानुसार, जे लोक प्रक्रिया केलेलं अन्न जास्त प्रमाणात खातात त्यांना ह्रदयविकाराचे आजार होण्याची शक्यता असते.

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 07:10 PM IST

प्रक्रिया केलेले पदार्थ खाताय? मग आहे खूपच धोकादायक कारण...

मुंबई, 18 जून : दिवसातून एकदा तरी प्रक्रिया केलेल्या अन्न आपण खातोच. मांसाहारी, गोठवलेले पदार्थ, प्रकिया केलेलं दूध जवळपास अशा सर्वच प्रकारच्या पदार्थांवर प्रक्रिया केली जाते.  त्यामध्ये सोडा, कुकीज, इंस्टंट न्यूडल्स, शाकाहारी आणि चिकन नगेट्स या पदार्थांचा समावेश आहे. नाश्त्यात खाल्ल्या जाणाऱ्या सिरीअल्स आणि एनर्जी बार्स अशा हेल्दी समजल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थांवरही प्रक्रिया होते.

नॅशनल इन्सस्टिट्यूट ऑफ हेल्थमधील शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, जे लोक प्रक्रिया केलेलं अन्न जास्त प्रमाणात खातात त्यांच्यामध्ये रोज सरासरी 500 पेक्षा अधिक कॅलेरीजचं प्रमाण आढळतं. याउलट कमी प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये कॅलेरीजचं प्रमाण कमी असतं.

शरीराला हानिकारक का आहे प्रोसेस्ड् फूड?

या पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं

प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये सहसा साखर किंवा फ्रुक्टोस काॅर्न सिरप असतं. अतिरिक्त साखर ही कॅलेरीज असल्याने ती शरीराकरता उपयुक्त नसते. अतिसेवनाने शरीराचं मेटाबोलिजम बिघडू शकतं.

Loading...

त्यामध्ये फायबर नसतात

फायबर शरीराला पचनाकरता मदत करतात. पण रासायनिक बदल केलेल्या पदार्थांमध्ये फायबर काढलेले असतात. अशा पदार्थांचं सेवन करणाऱ्या व्यक्तीची कार्बोहायड्रेटसचं शोषण कमी करण्याची क्षमता खालावते.

व्यक्तीला अॅडिक्टिव करणारे रासायनिक बदल

चिप्ससारख्या पदार्थांवर रासायनिक प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे हे पदार्थ शरीरात डोपामिन तयार करतात. डोपामिन हे plessure nurotransmitor आहे जे आपल्या चेतारज्जूद्वारा मेंदूपर्यंत सिग्नल पोहचवते. हा संदेश मुख्यत: आनंदाशी निगडीत असतो.

सेवनाने संतापाची भावना तयार होते

अभ्यासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये असणारे ट्रान्स्-फॅट तुमच्यातील चिडचिडेपणा आणि संतापाची भावना वाढवतात. तर, युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये केलेल्या अभ्यासात असं सांगण्यात आलं, प्रोसेस्ड् फूडमध्ये असणारे DTFAs म्हणजेच डायेटरी ट्रान्स्-फॅटी अॅसिड हे चिडचिडेपणा आणि संतापाशी संबंधीत आहेत.

शरीरात सोडियमची पातळी वाढवतात

काही प्रमाणात शरीराला सोडियमची गरज असते मात्र, त्याचं अतिसेवन केल्याने उच्च रक्तदाब आणि cardiovascular म्हणजे हृदयातल्या रक्तवाहिन्यांशी निगडीत विकार उद्भवू शकतात. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये चवीसाठी आणि भरपूर वेळ जतन करण्यासाठी सहसा मिठाचा जास्त वापर होतो.

झोपेवर परिणाम होतो

शुद्ध कार्बोहायड्रेटसच्या अतिपचनाने शरीरातील ब्लड शुगरवर आणि झोपेवर परिणाम होतो.


VIDEO : शेतकरी कर्जमाफीवरून सरकारवर टीका, अजित पवार म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 07:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...