सावधान! तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहता? मग तुम्हाला होऊ शकतो 'हा' त्रास

सावधान! तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहता? मग तुम्हाला होऊ शकतो 'हा' त्रास

एका अभ्यासात अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, अपार्टमेंटमध्ये - मुख्यतः उंच इमारतीत राहण्याऱ्या लोकांना दोन मुख्य आजार होण्याची शक्यता जास्त असते.

  • Share this:

मुंबई, 3 जुलै : महागाईच्या काळात माणसाला जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी दिवसेंदिवस अधिक महाग होत आहेत. विकासासाठी माणसं गावातून शहराकडे वळतात. मोठ्या शहरांत महागाईमुळे राहण्यासाठी जागा विकत घेणं फारच कठीण होतं. बहुतेक लोक अपार्टमेंटमध्ये राहणं पसंत करतात. बहुतेक याच कारणाने शहरांमध्ये मोठ्या, उंच बिल्डींगचं कल्चर वाढताना दिसत आहे. याच विषयावर करण्यात आलेल्या एका अभ्यासात अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, अपार्टमेंटमध्ये राहण्याऱ्या लोकांना हृदयविकार आणि मधुमेह हे आजार होण्याची शक्यता जास्त आहे. अपार्टमेंटमध्ये राहणारे लोक निसर्गापासून दूर होतात. हवामान बदल, अशुद्ध हवा आणि प्रदूषण अशा वातावरणात राहिल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होतो.

अभ्यासकांनी अपार्टमेंटमध्ये राहणारे लोक आणि प्रदूषण याविषयांवर निरीक्षण केले. निरोगी शरीराला आवश्यक असणारं शुद्ध वातावरण. उंच बिल्डींगमध्ये राहणाऱ्या लोकांना ते मिळत नाही. निसर्गापासून त्यांचा थेट संपर्क तुटलेला असतो. त्यामुळे शुद्ध वातावरणाचा अभाव तिथे असतो. हेच मुख्य कारण आहे की, इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास होण्याचा धोका अधिक आहे. एवढंच नाही तर, 'मेटाबॉलिक सिंड्रोम' म्हणजेच चयापचयाच्या क्रियेतही अडथळे निर्माण होऊ शकतात.

साबण आणि टुथपेस्टच्या वापराने होतात ‘हे’ भयानक आजार !

तिथे राहणाऱ्या लोकांच्या शरीरात ‘ट्राइग्लिसराइड’चं प्रमाण वाढतं. हे शरीराकरीता वाईट आणि अनावश्यक कॉलेस्ट्रॉल असतं. ट्राइग्लिसराइडचं शरीरात प्रमाण वाढल्यास हृदयविकार होण्याचा धोका वाढतो. आणि शरीरासाठी आवश्यक लिपोप्रोटीन कॉलेस्ट्रॉल कमी होतं. त्यामुळेच मधुमेह आणि लठ्ठपणा सारख्या समस्या उद्भवतात. विकसनशील देशांमध्ये बहुतांशी लोकांचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने किंवा हृदयाशी निगडीत आजारांमुळे होतो. अशी माहिती याआधी करण्यात आलेल्या अभ्यासात समोर आली आहे.

तुमचं स्वतःवर प्रेम आहे का ? हे नक्की वाचा

उच्च रक्तदाब आणि मेटाबॉल‍िक सिंड्रोम ही हृदयविकाराची काही प्रमुख कारणे आहेत. अशा समस्यांपासून दूर राहण्यासाठी तज्ञांनी सल्ला दिला आहे की, अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या आसपासच्या परिसरात भरपूर झाडं लावली पाहिजेत. जेणेकरून प्रदूषण कमी होईल आणि ऑक्सिजनचा समतोल राखला जाईल.

LIVE VIDEO एका वाघिणीसाठी दोन वाघांची तुंबळ लढाई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 08:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading