मुंबई 22 जानेवारी : दारू आरोग्यासाठी चांगली नाही हे आपल्या सर्वांना माहित आहे. दारूत असलेल्या अल्कोहोलचा संपूर्ण शरीरावर वाईट परिणाम होतो. तसेच त्यामुळे हृदयविकाराचा धोका देखील वाढतो. आज आपण जास्त प्रमाणात अल्कोहोल घेतल्याने त्याचा शरीरावर काय परिणाम होतो आणि ते तुमच्या शरीरासाठी कसे हानिकारक ठरते हे जाणून घेणार आहोत.
अनेक लोकांना मद्यपान केल्याने केवळ यकृताचा म्हणजेच लिव्हरचा त्रास होतो, परंतु केवळ यकृतच नाही तर दारूचा हृदयावरही खूप वाईट परिणाम होतो. हरजिंदगीच्या रिपोर्टनुसार, जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने हायपरटेन्शनचा त्रास होतो आणि त्यामुळे हृदयाचे स्नायू अधिक कमकुवत होतात. यामुळे रक्त पंपिंगची समस्या देखील उद्भवते आणि हे सतत चालू राहिल्यास हार्ट फेल्यूअरची समस्या उद्भवू शकते.
महिलांवर होतो वाईट परिणाम
अल्कोहोल घेतल्याने स्त्री आणि पुरुष दोघांनाही हृदयविकाराची समस्या होऊ शकते. परंतु केवळ महिलांचा विचार केला तर अति मद्यपानामुळे त्यांना खूप त्रास होऊ शकतो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या संशोधनातून असे समोर आले आहे की अति मद्यपान केल्याने महिलांना शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
अल्कोहोलमुळे महिलांवर काय परिणाम होतो?
- दारू प्यायल्याने महिलांमध्ये लिव्हर सिरोसिसची समस्या अधिक होऊ शकते. पुरुषांच्या तुलनेत महिला याने जास्त ग्रस्त होतात. दारुमुळे महिलांच्या मेंदूवरही परिणाम होऊ शकतो.
- महिलांनी दारू प्यायल्यास महिलांना स्तनाच्या कर्करोगाशी निगडीत समस्या उद्भवू शकतात. तसेच गर्भधारणेदरम्यान महिलांनी अल्कोहोल प्यायल्याने बाळाला फेटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डरचा धोका असतो.
- अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे गर्भपात, स्टिल बॉर्न बेबी आणि बाळाला अनेक जन्मजात रोगांचा धोका वाढतो. मासिक पाळीच्या दरम्यान अल्कोहोल प्यायल्याने रक्त पातळ होणे किंवा अतिरिक्त रक्तस्त्रावाची समस्या होऊ शकते.
- एका मर्यादेत दारू पिणे वाईट नाही, पण जर तुम्ही जास्त प्रमाणात दारी पित असाल तर तुम्हाला अधिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हे कायम लक्षात ठेवा की जास्त प्रमाणात मद्यपान केल्यास शरीराचे कायमचे नुकसान देखील होऊ शकते.
- सर्वात महत्वाचे म्हणजे अल्कोहोल प्यायल्याने तुम्हाला काही त्रास होत असेल किंवा नेहमी अल्कोहोल घेतल्यानंतर तुम्हाला समस्या उद्भवत असतील तर अशा वेळी तुमच्या डॉक्टरांशी नक्की संपर्क साधा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alcohol, Health, Health Tips, Lifestyle