Home /News /lifestyle /

coronavirus: लॉकडाउन काळात वाढलं दारू पिण्याचं प्रमाण; आठवड्याला 19 टक्क्यांची वाढ

coronavirus: लॉकडाउन काळात वाढलं दारू पिण्याचं प्रमाण; आठवड्याला 19 टक्क्यांची वाढ

लॉकडाउनच्या (Lockdown) काळात घरी बसून दारू पिण्याचं प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत वाढलं आहे. मार्चचा मध्य ते एप्रिलचा मध्य या कालावधीत 18 वर्षांवरील 2000 व्यक्तींचा सर्व्हे केल्यानंतर हे निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत.

  नवी दिल्ली, 22 डिसेंबर : कोरोना व्हायरसच्या (Covid 19) साथीमुळे जवळपास हे सगळं वर्ष लॉकडाउन (Lockdown) सुरूच आहे. सुरुवातीला असलेला कडक लॉकडाउन, त्यानंतर काही नियम शिथिल करून पुढे अनलॉक चालू आहे. अनेक लोक घरी बसून काम करत आहेत. शाळा, कॉलेजही ऑनलाईन सुरू आहेत. अशावेळी दारू पिणारेही घरी बसून मद्यपानाचा आनंद घेत असून, दारू पिण्याचं प्रमाण या काळात चांगलंच वाढल्याचं दिसून आलं आहे. अमेरिकन जर्नल ऑफ ड्रग अँड अल्कोहोल अब्युझमध्ये (American Journal of Drug and Alcohol Abuse) प्रकाशित करण्यात आलेल्या एका नवीन अभ्यास अहवालानुसार, लॉकडाउनच्या (Lockdown) काळात घरी बसून दारू पिण्याचं प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत वाढलं आहे. मार्चचा मध्य ते एप्रिलचा मध्य या कालावधीत अमेरिकेतील 18 वर्षांवरील 2000 व्यक्तींचा सर्व्हे केल्यानंतर हे निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत. दोन तासांत पाच किंवा त्यापेक्षा जास्त ड्रिंक्स घेणारे पुरुष आणि चार किंवा त्यापेक्षा जास्त ड्रिंक्स घेणाऱ्या महिला यांना बिंज ड्रिंकर्स (Binge Drinkers) म्हणतात. त्यांचं दारू पिण्याचं प्रमाण आठवड्याला जवळपास 19 टक्के वाढलं आहे. जे लोक नेहमी दारू पित नाहीत, अशा लोकांच्या तुलनेत या बिंज ड्रिंकर्सचं (Binge Drinkers) दारू पिण्याचं प्रमाण सध्या दुप्पट झालं आहे, असा निष्कर्ष या अहवालात नोद्वाण्यात आला आहे.

  (वाचा - कोरोनाशी लढण्यात महिला पुरुषांपेक्षा सरस,रोगप्रतिकारवर्धक हॉर्मोन्सचा होतो फायदा)

  कोरोना साथ, त्यामुळे वाढलेला ताण आणि दारू पिण्याशी त्याचा संबंध हे स्पष्ट करणारा हा अभ्यास टेक्सास युनिव्हर्सिटीच्या (Texas University) टेक्सास हेल्थ सायन्स सेंटर स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या (University of Texas Health Science Center School of Public Health) वतीने करण्यात आला. यात लहान गटांचा आणि सहभागी व्यक्तींनी स्वतःच माहिती भरायची असल्याने यातील निष्कर्ष सगळ्यांना सरसकट लागू पडू शकत नाहीत. हा एक ढोबळ अंदाज असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

  (वाचा - coronavirus: मास्कचा अतिवापरही ठरू शकतो घातक; वाचा काय आहेत दुष्परिणाम)

  यामध्ये असं आढळलं की, अती दारू पिणारे लोक एका वेळी आता चार ड्रिंक्स घेत आहेत. आठवड्याला घरातच राहण्याचा वेळ आता वाढला आहे, त्यामुळे ताण वाढला असून, त्याचा परिणाम दारू पिण्याचं प्रमाण वाढण्यावरही झाला आहे, असं निरीक्षण टेक्सास युनिव्हर्सिटीतील पी.एचडीची विद्यार्थिनी सितारा वीराकून (Sitara Werakoon) हिनं नोंदवलं आहे. यापुढं दारू पिण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि घरात राहून एकटेपणा वाढलेल्या लोकांसाठी काही नाविन्यपूर्ण उपाययोजना करण्यावर भर देण्याची गरज असल्याचा निष्कर्षही यात नोंदवण्यात आला आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Coronavirus, Lockdown

  पुढील बातम्या