कोरोनापासून बचाव करणार Wristband, एकमेकांच्या जवळ जाताच वाजणार अलार्म

कोरोनापासून बचाव करणार Wristband, एकमेकांच्या जवळ जाताच वाजणार अलार्म

Wristband तुम्हाला सोशल डिस्टन्सिंगची (social distancing) आठवण करून देणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मे :  तुमच्या आरोग्याची काळजी घेणारे अनेक रिस्टबँड (wristband) आहेत, हे तर तुम्हाला माहितीच आहे. मात्र आता कोरोनाव्हायरसापासूनही हा रिस्टबँड तुमचा बचाव करणार आहे. कोरोनाव्हायरसवर सध्या ना लस, ना औषधं. त्यामुळे हात धुणं, मास्क वापरणं, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग (social distancing) हेच त्यापासून बचाव करण्याचे मार्ग आहेत आणि याच सोशल डिस्टन्सिंगची तुम्हाला आठवण करून देणार आहे रिस्टबँड.

कॅनडाच्या कंपनीनं हे रिस्टबँड तयार केलं आहे. जे घातल्यानंतर 2 व्यक्ती 6 फूटांपेक्षा कमी अंतरावर एकमेकांच्या जवळ आल्या तर त्यांना सावध करणार आहे. या रिस्टबँडचा अलार्म वाजेल किंवा तो फ्लॅश देईल.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल मॅकडोनाल्ड यांनी सांगितलं की, "सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी लोकांना एकप्रकारचं रिमांइडर हवं आहे आणि हेच लक्षात घेत हे रिस्टबँड तयार करण्यात आलं आहे. ऑफिसमध्ये 2 व्यक्ती  तर अलार्म वाजू लागणार.  कंपनीने आतापर्यंत असे दहा हजार रिस्टबँड विकलेत"

हे वाचा - काय टेक्नॉलॉजी आहे! शरीरावर फक्त टॅटू लावून मेंदूत काय चालतंय ते समजणार

द वॉशिंगटन पोस्टच्या रिपोर्टनुसार या रिस्टबँडची किमत 100 डॉलर आहे.  मे अखेरपर्यंत कंपनी या रिस्टबँडची शिपिंग सुरू करू शकते. फोर्ड आधीपासूनच आपल्या कारखान्यात सॅमसँग स्मार्टवॉचसह प्रयोग करत आहे, जे कर्मचारी एकमेकांच्या जवळ आल्यानंतर त्यांना अलर्ट करतील. बेल्जियमच्या अँटवर्पमध्ये एका बंदरावर काम कराणाऱ्या काही लोकांना युरोपीयन कंपनीमार्फत हातात घालण्यासाठी एक विशेष उपकरण देण्यात आलं आहे, जे घड्याळाप्रमाणे दिसतं. जर दोन व्यक्ती एकमेकांपासून 5 फूट अंतरावर असतील तर हे उपकरण त्यांना सावध करतं.

हे वाचा - क्वारंटाईन स्टॅम्पचा लहान मुलांच्या त्वचेवर परिणाम, हातावर झाल्या जखमा

असे रिस्टबँड घालणं बंधनकारक केलं जाऊ शकतं, असं मानलं जातं आहे. कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्क, ग्लोव्ह्जप्रमाणे आता हे रिस्टबँड वापरण्याची गरज असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. अशा रिस्टबँडमार्फत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोना संक्रमणापासून वाचवू शकतात. पाश्चिमात्य देशांमध्ये वाढतं कोरोना संक्रमण पाहता या अशा घड्याळांसह एक अशी ट्रकिंग सिस्टमही डेव्हलप केली जाते आहे, जी कोरोना संक्रमित व्यक्ती संपर्कात आल्यास सूचना देईल.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: May 15, 2020, 6:40 PM IST

ताज्या बातम्या