मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अक्षय तृतीयेला बदलणार बुध ग्रहाचं स्थान, जाणून घ्या तुमच्या राशीवर काय होणार परिणाम

अक्षय तृतीयेला बदलणार बुध ग्रहाचं स्थान, जाणून घ्या तुमच्या राशीवर काय होणार परिणाम

25 एप्रिलला शनिवारी 2.43 पहाटे बुध ग्रहाचं मेष राशीमध्ये प्रवेश करत आहे. या दिवसाची सुरुवात अक्षय तृतीयेनं होते असं मानलं जातं.

25 एप्रिलला शनिवारी 2.43 पहाटे बुध ग्रहाचं मेष राशीमध्ये प्रवेश करत आहे. या दिवसाची सुरुवात अक्षय तृतीयेनं होते असं मानलं जातं.

25 एप्रिलला शनिवारी 2.43 पहाटे बुध ग्रहाचं मेष राशीमध्ये प्रवेश करत आहे. या दिवसाची सुरुवात अक्षय तृतीयेनं होते असं मानलं जातं.

    मुंबई, 26 एप्रिल : प्रत्येक दिवस सारखा नसतो. राशीतील बदलत्या स्थितीचा परिणाम आपल्या ग्रहावर होत असतो. 25 एप्रिलला शनिवारी 2.43 पहाटे बुध ग्रहाचं मेष राशीमध्ये प्रवेश करत आहे. या दिवस परशुराम दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवसाची सुरुवात अक्षय तृतीयेनं होते असं मानलं जातं. कोरोनाच्या प्रादूर्भावात बुधाचा मेष राशीत होणारा प्रवेश कसा असेल जाणून घ्या राशीभविष्य. मेष- आरोग्याची काळजी घ्या. बुधाचा आपल्या राशीत प्रवेश झाल्यानं आत्मविश्वास वाढेल. भविष्यातील योजनांचे आज योग्य निर्णय घेऊ शकाल. वृषभ- खर्चात वाढ होईल. पैशांचा योग्य वापर करणं आवश्यक आहे. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. दीर्घ काळापासून प्रलंबित असणारी कामं पूर्ण होईल. मिथुन- आपल्या बोलण्याला फार महत्त्व प्राप्त होईल. बोलण्यातून मन जिंकाल. प्रलंबित कामं मार्गी लागतील. कर्क- नोकरीमध्ये चढ-उतार येतील. कामाच्या ठिकाणी कठोर मेहनत करावी लागेल. परिवर्तनाचा चांगला योग आहे. सिंह - अडकलेल्या योजना य़शस्वीरित्या पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जी कामं करण्याची भीती वाटते आज ती पूर्ण करण्याचे लक्ष्य राहिल. कन्या- कामाच्या ठिकाणी समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात चढ-उतार पाहायला मिळतील. आपल्याला कार्यात सफलता मिळेलच असे नाही. तुळ- ग्रहांची स्थिती आपल्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. भाग्य आपल्या बाजूनं असेल. वृश्चिक- आरोग्याच्या समस्या उद्भवतील. आपण वाद टाळण्याचा प्रयत्न करा. पैसे खर्च होतील. आर्थिक समस्या उद्भवल्यानं ताण येईल. धनु- नवीन योजनांवर काम कराल. व्यवसायात चांगला फायदा होईल. कामाच्या ठिकाणी सावधिगी बाळगणं आवश्यक आहे. मकर- ही वेळ आपल्यासाठी लाभदायी आहे. वाहन खरेदी कऱण्याची संधी आहे. आई-वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. कुंभ- शैक्षणिक क्षेत्रात प्रगती कराल. दबदबा वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. मीन- आपल्या राशीतील बुध ग्रहाचं स्थान बदलल्यानं आपल्या वाणीवर आपलं नियंत्रण राहणार नाही. आपल्या शब्दांमुळे समोरच्याला दुखावलं जाऊ शकतं त्यामुळे शब्द जपून वापरा. व्यापारी वर्गासाठी हा कालावधी शुभ आहे. स्वस्त सोने खरेदी करण्याचा शेवटचा दिवस,जाणून घ्या मोदी सरकारची ही फायदेशीर योजना अक्षय तृतीयेदिवशी घरबसल्या खरेदी करा सोनं, हे ज्वेलर्स देत आहेत खास ऑफर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Astrology and horoscope, राशीभविष्य

    पुढील बातम्या