मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /वैशिष्ट्यपूर्ण ग्रहयोगांमुळे यंदाची अक्षय्य तृतीया आहे विशेष फलदायी! जाणून घ्या का?

वैशिष्ट्यपूर्ण ग्रहयोगांमुळे यंदाची अक्षय्य तृतीया आहे विशेष फलदायी! जाणून घ्या का?

 अक्षय्य तृतीया हा एक मुहूर्त (Shubh Muhurta) मानला जातो. कोणतंही शुभ काम करण्यासाठी हा दिवस योग्य मानला जातो.

अक्षय्य तृतीया हा एक मुहूर्त (Shubh Muhurta) मानला जातो. कोणतंही शुभ काम करण्यासाठी हा दिवस योग्य मानला जातो.

Akshaya Tritiya 2022: ज्योतिषीय गणनेनुसार यावेळी मंगळ रोहिणी नक्षत्राच्या शोभन योगात अक्षय्य तृतीया साजरी होईल. अक्षय्य तृतीया शुभ योगात साजरी करण्याचा हा योगायोग 30 वर्षांनंतर आला आहे. इतकेच नाही तर 50 वर्षांनंतर या दिवशी ग्रहांची विशेष स्थितीही तयार होत आहे.

पुढे वाचा ...

    मुंबई, 20 एप्रिल : हिंदू धर्मात वर्षभरात अनेक सण (Festival) साजरे केले जातात. प्रत्येक सणाचं खास असं वैशिष्ट्य असतं. बहुतांश सण हे विशिष्ट तिथीनुसार साजरे केले जातात. अक्षय्य तृतीया ही त्यापैकीच एक होय. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेली अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) वैशाख शुक्ल तृतीयेला साजरी केली जाते. या दिवशी व्रत-वैकल्य, पूजाविधीसोबतच नव्या गोष्टींना सुरुवात आणि नव्या वस्तूंची खरेदी केली जाते. या वर्षी मंगळवारी (3 मे) अक्षय्य तृतीया आहे. ज्योतिष शास्त्रानुसार (Jyotish Shastra), यंदा अक्षय्य तृतीया रोहिणी नक्षत्रातल्या शोभन योगावर साजरी होत आहे. सुमारे 30 वर्षांनी या शुभ योगावर अक्षय्य तृतीया आलेली आहे. तसंच, सुमारे 50 वर्षांनंतर या दिवशी ग्रहांचे विशेष योग होत आहेत. त्यामुळे अक्षय्य तृतीया अधिकच वैशिष्टयपूर्ण आहे, असं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे. `आज तक`ने याविषयीची माहिती दिली आहे.

    साडेतीन मुहूर्तांपैकी असलेली अक्षय्य तृतीया ही सुख-समृद्धीच्या अनुषंगाने शुभ मानली जाते. या दिवशी अनेक लोक नव्या कामाला, नव्या गोष्टींना सुरुवात करतात. या दिवशी सोनं-चांदी खरेदी केली जाते. अक्षय्य तृतीयेला आखा तीज असंही म्हटलं जातं. या दिवशी अनेक लोक विशेष व्रत, पूजाविधी करतात. आखा तीजला दोन कलशांचं दान महत्त्वपूर्ण मानलं जातं. यापैकी एक कलश पितरांचा तर दुसरा कलश भगवान विष्णू (Lord Vishnu) यांचा मानला जातो. यात पितरांचा कलश पाण्याने भरावा. त्यात काळे तीळ, चंदन आणि पांढरी फूलं टाकावीत. भगवान विष्णु यांचा कलश देखील पाण्याने भरावा. त्यात पिवळी आणि पांढरी फूलं, चंदन आणि पंचामृत टाकून त्यावर फळ ठेवावे. या कलशाच्या दानामुळे पितर आणि भगवान विष्णुंचा आशिर्वाद प्राप्त होतो, तसेच कुटुंबात सुख -समृद्धी कायम राहते, असं सांगितलं जातं.

    ज्योतिष अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 50 वर्षांनंतर वैशाख शुक्ल तृतीयेला दोन महत्त्वाचे ग्रह (Planet) त्यांच्या उच्च राशीत तर अन्य दोन ग्रह स्वराशीत असतील. शुभ योग आणि ग्रहांची स्थिती पाहता अक्षय्य तृतीयेला दान केल्यास पुण्य मिळेल. या दिवशी पाण्याने भरलेल्या कलशावर फळ ठेवून ते दान करणं अत्यंत शुभ फलदायी असतं. या दिवशी कोणतंही शुभ कार्य करण्याकरिता मुहूर्त पाहण्याची गरज नाही. यंदाची अक्षय्य तृतीया रोहिणी नक्षत्र, शोभन योग, तैतिल करण आणि वृषभ राशीत चंद्र असताना येत आहे. या दिवशी मंगळवार आणि रोहिणी नक्षत्र असल्याने मंगल रोहिणी योगही होत आहे. तसेच पाच दशकांनंतर होणारी ग्रहांची स्थिती देखील वैशिष्टयपूर्ण असेल.

    अक्षय्य तृतीयेला चंद्र वृषभ (Taurus) या त्याच्या उच्चराशीत, शुक्र मीन (Pisces) या उच्च राशीत असेल. शनी हा त्याच्या कुंभ (Aquarius) राशीत तर गुरु हा त्याच्याच मीन राशीत असेल. भारतीय ज्योतिष शास्त्रानुसार हे चारही ग्रह अनुकूल स्थितीत असल्याने अक्षय्य तृतीया खूपच खास असेल. या दिवशी कोणतंही शुभ कार्य करणं निश्चितच शुभफलदायी ठरेल.

    First published:

    Tags: Festival, अक्षय तृतीया