नवी दिल्ली, 20 एप्रिल: हिंदू धर्मात गुढी पाडवा, दसरा अर्थात विजयादशमी, बलिप्रतिपदा आणि अर्धा मुहूर्त अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्त मानले जातात. या दिवशी नव्या कामाची सुरुवात, शुभकार्य आणि नव्या वस्तूंची खरेदी केली जाते. या प्रत्येक मुहूर्ताचं खास असं वैशिष्ट्य आहे. त्यात अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) ही तिथी खूपच शुभ मानली गेली आहे.
या दिवशी विवाह, मुंज आणि गृहप्रवेशासारखी शुभकार्यं करायची असतील, तर वेगळा मुहूर्त काढण्याची गरज नसते. या दिवशी काही जण घरात विशेष पूजा, जप, होम आदी विधी करतात. अक्षय्य तृतीयेला पितरांना केलेलं पिंडदान विशेष फलदायी असतं, असं पुराणात लिहिलेलं आहे.
हिंदू पंचांगानुसार दर वर्षी वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या तृतीयेला अक्षय्य तृतीया अर्थात आखा तीज असते. यंदा 3 मे 2022 रोजी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
शुभकार्यासाठी अक्षय्य तृतीया ही उत्तम मानली जाते. या दिवशी भगवान श्री विष्णूंचा (Shri Vishnu) अवतार मानल्या जाणाऱ्या भगवान परशुराम यांची जयंतीदेखील असते. अक्षय्य तृतीयेला गंगा स्नानाचं विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. या दिवशी गंगा स्नान केल्यास नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळते, असं सांगितलं गेलं आहे. या दिवशी श्री विष्णूंची पूजा केली जाते. यालाच अक्षय्य तृतीया व्रत असंही म्हणतात.
हे वाचा - प्रत्यक्ष सोनं विकत घेणं चांगलं की डिजीटल gold, ETF? त्यावर कसा आकारला जातो कर?
वाचा - Gold Price Today: सोनं महिनाभराच्या उच्चांकावर; आज किती वाढली किमती? चेक करा नवे दर
यंदा मंगळवारी (3 मे 2022) पहाटे 5 वाजून 19 मिनिटांनी तृतीया सुरू होणार आहे. 4 मे रोजी सकाळी 7 वाजून 33 मिनिटांपर्यंत ही तिथी असेल. या दिवशी चंद्र रोहिणी नक्षत्रात असेल. रोहिणी नक्षत्र सकाळी 12 वाजून 34 मिनिटांनी सुरू होत असून, 4 मे रोजी पहाटे 3 वाजून 18 मिनिटांपर्यंत असेल. त्यामुळे हे शुभपर्व नव्या वस्तू खरेदी करण्यासाठी, तसंच नवी सुरुवात करण्यासाठी विशेष महत्त्वाचं असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.