मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अंजलीला लागली राणादाच्या नावाची हळद आणि मेहंदी; पण लग्नापूर्वी का लावली जाते माहितीये?

अंजलीला लागली राणादाच्या नावाची हळद आणि मेहंदी; पण लग्नापूर्वी का लावली जाते माहितीये?

लग्नापूर्वी का लावली जाते हळद आणि मेहंदी?

लग्नापूर्वी का लावली जाते हळद आणि मेहंदी?

अंजली बाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर आणि राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी यांना नुकतीच मेहंदी आणि हळद लागली. पण तुम्हाला माहितीये का लग्नापूर्वी हळद आणि मेहंदी का लावली जाते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

 मुंबई, 1 डिसेंबर : सर्वांची आवडती अंजली बाई आणि राणादा यांच्या लग्नाच्या सर्व विधींना सुरुवात झालीये. त्यांची मेहंदी आणि हळदीचा सोहळाही आज पार पडला. अंजली बाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर आणि राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी यांचे चाहते त्यांच्या लग्नाने फारच खुश आहेत. अक्षया आणि हार्दिकला तर मेहंदी आणि हळद लागली. पण तुम्हाला माहितीये का लग्नापूर्वी हळद आणि मेहंदी का लावली जाते.

हातांवर मेहंदी काढण्याला खूप महत्त्व आहे. हातांवर मेहंदी काढून छान छान डिझाइन्स बनवली जातात. लग्न समारंभात तर मेहंदीला विशेष महत्त्व असतं. लग्नात वधू-वरांच्या हातावर मेहंदी लावली जाते. मेंदीचा वापर केवळ भारतातच नाही, तर इतर अनेक देशांमध्ये केला जातो. हळददेखील औषधी म्हणून खूप उपयुक्त आहे. चला तर मग जाणून घेऊया लग्नापूर्वी नवरदेव नवरीला मेहंदी आणि हळद का लावली जाते.

प्रेमात कधीच धोका देत नाही या मुली, भरभरून प्रेम करतात...

हातावर मेहंदी लावण्याचे कारण

भारतात लग्नापासून अनेक धार्मिक प्रसंगी हातांवर मेहंदी काढली जाते. हिंदू धर्मात हा सोळा श्रुंगारांचा भाग मानला जातो. लग्नात वधू आणि वर दोघांच्याही हातांवर मेहंदी लावली जाते. त्यालाच मेहंदी काढणं असं म्हणतात. यामागे एक खास कारण आहे. खरं तर ही मेहंदी केवळ सौंदर्यातच भर घालत नाही, तर ती अतिशय पवित्रदेखील आहे.

असं म्हटलं जातं, की लग्नाच्या वेळी वधू-वरांना अस्वस्थ वाटू लागतं, ते घाबरतात. अशा परिस्थितीत थंडावा देणारी मेहंदी लावल्यास शरीराचं तापमान कमी होतं. यासाठी त्यांच्या हाताला आणि पायाला मेहंदी लावली जाते. याशिवाय मेहंदी हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. मेहंदीचा रंग जितका लाल तितकं या जोडप्यामध्ये प्रेम वाढत जातं, असंही म्हणतात. तसंच लग्नात काढलेल्या मेहंदीचा रंग जेवढे जास्त दिवस टिकून राहील, तेवढंच ते नवीन जोडप्यांसाठी चांगलं असतं, असंही म्हटलं जातं.

जोडीदारावर भरभरून प्रेम करतात या महिला; ही जन्मतारीख असेल तर तिच्याशी बिनधास्त लग्न करा

वधू-वरांना हळद लावण्याचे कारण

वधू-वरांचा विवाह सोहळ्यातील हळदीचा कार्यक्रम खूप महत्वाचा असतो. हळदीच्या कार्यक्रमात विवाहित महिलांचा समावेश होतो. हळद लावल्याने त्वचेला फायदा होतो आणि लग्नापूर्वी वधू वराला एखादी ब्युटी ट्रीटमेंट दिल्यासारखे हे असते. मात्र हळदीच्या परंपरेमागे अशी समजूत आहे की, लग्नाला अनेक पाहुणे येतात, त्यांच्यापैकी अनेकांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग असू शकतो. अशा परिस्थितीत वधू-वरांना हळद लावली जाते, जेणेकरून त्यांना कोणताही संसर्ग होऊ नये. कारण हळद अँटी बायोटिक प्रमाणे काम करते आणि म्हणूनच हळदीचा विवाह विधींमध्ये वापर केला जातो.

First published:

Tags: Lifestyle, Marriage, Wedding