Home /News /lifestyle /

Akshay Tritiya 2022 : 100 वर्षांनी आलाय दुर्मिळ योग, अक्षय्य तृतीयेला करा 'हे' काम

Akshay Tritiya 2022 : 100 वर्षांनी आलाय दुर्मिळ योग, अक्षय्य तृतीयेला करा 'हे' काम

हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षय्य तृतीया हा सण मंगळवार, 3 मे रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी ग्रहांचा अद्भुत संयोगही तयार होत असल्याने अक्षय्य तृतीयेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या काळात सोने-चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी करणे खूप शुभ राहील.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 3 मे : हिंदू धर्मात सकारात्मक आणि चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी शुभ मुहूर्त (Shubh Muhurta) पाहिला जातो. अनेक जण पंचागात प्रत्येक दिवस पाहून त्या-त्या ग्रहांच्या स्थितीनुसार आपापली कार्य करत असतात. परंतु, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, विजयादशमी आणि दिवाळी पाडवा हे दिवस साडेतीन शुभ मुहूर्त मानले जातात. या दिवशी पंचांग पाहण्याची गरज नसते. यंदाची अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya) 3 मे 22 रोजी साजरी होणार आहे. अक्षय्य तृतीयेला ग्रहांचा आश्चर्यकारक योग दिसून येणार आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेचं महत्त्व आणखी वाढणार आहे. या दिवशीचं महत्त्व सांगणाऱ्या माहितीचं वृत्त आज तकनं प्रसिद्ध केलं आहे. हिंदू धर्मातल्या मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेच्या (Akshay Tritiya) दिवशी दान, स्नान, पूजा आणि आराधना केल्यास चांगलं फळ मिळतं. या दिवशी सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याची परंपरा आहे. सोन्या-चांदीचे दागिने घरी आणल्यास आपल्यावर लक्ष्मी देवीची कृपादृष्टी राहते, असं मानलं जातं. त्याशिवाय घर आणि वाहनांसारख्या गोष्टींचीही खरेदी करता येते. पौराणिक कथेनुसार, या दिवशी त्रेतायुग सुरू झालं. भगवान परशुरामांचा जन्मही याचदिवशी झाला असं मानलं जातं. या दिवशी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. अक्षय्य तृतीयेला सुरू केलेलं कार्य कायम राहतं, त्याचा कधीही क्षय होत नाही, अशी मान्यता हिंदू समाजात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग जुळून येणार आहेत. या दिवशी सूर्य मेष राशीत, चंद्र कर्क राशीत, शुक्र आणि गुरू ग्रह मीन राशीत आणि शनी कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. ही ग्रहांची स्थिती असेलच, शिवाय अक्षय्य तृतीयेला केदार, शुभ कर्तरी, उभयचरी, विमल आणि सुमुख नावाचे पाच राजयोग जुळून येणार आहेत. या दिवशी शोभन आणि मातंग योगसुद्धा विशेष असणार आहे. ग्रहांची ही शुभदशा आगामी 100 वर्षांमध्ये दिसून येणार नाही, असा दावा ज्योतिष्यांनी केला आहे. या तिथीला जया तिथीसुद्धा म्हटलं जातं. यंदा अक्षय्य तृतीयेचा सण मंगळवारी आला आहे. भूमिपूत्र मंगळ ग्रहाला मालमत्तेचा स्वामी म्हटलं जातं. त्यामुळेच ज्योतिषातले जाणकार मंगळवारी जमीन आणि घरांशी संबंधित प्रकरणांचा निपटारा करण्याचा सल्ला देतात. सोनं, चांदी आणि स्थावर मालमत्तेशिवाय तुम्ही कपडे, फर्निचर आणि भांडी खरेदी करू शकता. नवा व्यवसाय सुरू करण्यासाठीसुद्धा हा दिवस शुभ मानला जातो. या दुर्मिळ योगायोगाचा प्रभाव खूपच शुभ मानला जातो. या दिवशी सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदी केल्या तर घरात सुख-समृद्धी वाढणार आहे. सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने खरेदी करण्याची क्षमता नसेल, तर तुम्ही कोणत्याही धातूची वस्तू खरेदी करू शकता. या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंचे दीर्घकाळापर्यंत शुभ परिणाम दिसून येतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे 5 वाजून 39 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपर्यंत असेल. तसंच पहाटे 5 वाजून 39 मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी 5 वाजून 38 मिनिटांपर्यंतच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करू शकणार आहात. त्यामुळे तुमच्या पद्धतीने अक्षय्य तृतीया साजरी करा अगदी खरेदी जमली नाही तरीही एखाद्या चांगल्या कामाला तुम्ही सुरुवात करू शकता.
    First published:

    Tags: Festival, Hindu

    पुढील बातम्या