लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे ओवा; प्रत्येक पालकाला माहिती असावेत हे फायदे

लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे ओवा; प्रत्येक पालकाला माहिती असावेत हे फायदे

फक्त मुलांची दुखणीच नाही तर मुलांच्या अनेक वाईट सवयी सोडवण्यासाठीदेखील ओवा (ajwain) फायदेशीर आहे.

  • Last Updated: Sep 15, 2020 09:10 PM IST
  • Share this:

लहानपणी आपल्या पोटात दुखू लागलं की आपली आजी किंवा आई आपल्याला ओवा खायला द्यायची. प्रत्येकाला हे आठवत असेल. पोटाच्या कोणत्याही समस्या जाणवू लागल्या की ओवा खायचा सल्ला दिला जातो. ओवा खाल्ल्यानंतर पोटातील वेदनांपासून तात्पुरता आराम मिळतो.  ओवा अधिकतर मसाल्याच्या रूपात सर्वाधिक वापरला जातो. बंगाल, पंजाब, दक्षिण भारत या प्रांतांमध्ये त्याचं उत्पादन जास्त आहे. आयुर्वेदात ओव्याचे बरेच फायदे सांगितले आहेत. ओव्याचे एक वैशिष्ट्यं म्हणजे ते शंभर प्रकारचं धान्यं पचवण्यास सक्षम आहे.

myupchar.com शी संबंधीत डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या म्हणण्यानुसार ओव्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते. ओव्यामध्ये प्रथिनं, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, राइबोफ्लेविन, थायमिन आणि खूप थोड्या प्रमाणात निकोटिनिक अॅसिड, आयोडीन, सेपोनिन, टॅनिन, केरोटीनही असतं. लहान मुलांमध्ये पोटाच्या अनेक समस्या असतात. त्यांच्यासाठी ओवा अत्यंत उपयुक्त आहे.

पोटातील कृमी दूर करण्यात मदत करतो

मुलांना बर्‍याचदा पोटातील कृमींचा त्रास होतो. यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे मुलांना गोड पदार्थ खूप आवडतात. गोड खाण्यामुळे त्यांच्या पोटात कृमी होतात. ओवा ह्या त्यावरील उपचारांमधील एक महत्त्वाचं आयुर्वेदिक औषध आहे. मुलांच्या पोटातील कृमी दूर करण्यासाठी त्यांना दिवसातून 3 वेळा सलग पाव चमचा खारट ओवा खायला द्या. याशिवाय झोपेच्या वेळी त्यांना 4-5 थेंब ओव्याचे तेल पाजा यामुळे पोटातील जंतांचा नाश होतो.

मुलांची माती खाण्याची सवय सुटेल

मुलांना माती किंवा खडू यासारख्या गोष्टी खायला आवडतात. त्यांना थांबवणं आणि या सवयीपासून मुक्त करणं खूप कठीण काम आहे. मात्र ओवा सेवन केल्याने ही सवय सोडवली जाऊ शकते. यासाठी दररोज रात्री त्यांना एक चमचा ओब्याचे चूर्ण तीन आठवड्यांपर्यंत झोपायच्या वेळी द्या. काही दिवसांतच त्यांची ही सवय नाहीशी होईल. जर घरातील मोठ्यांना अशी कोणतीही सवय असेल, तरीदेखील या उपायाचा अवलंब करू शकता.

पोटदुखीमध्ये मदत

मुलांमध्ये पोटदुखीसाठी ओवा हा एक प्रभावी उपाय आहे. एक ग्रॅम काळं मीठ आणि दोन ग्रॅम ओवा कोमट पाण्यातून पाजा. यामुळे त्यांना पोटदुखीपासून आराम मिळेल. ज्याला पोटदुखीचा त्रास असेल ते देखील हे मिश्रण वापरू शकतात.

खोकल्यापासून आराम

खोकल्याच्या समस्येमध्ये ओवा अधिक फायदेशीर आहे. खोकला झाल्यास एक चमचाभर ओवा योग्य प्रकारे चघळून खा आणि वरून गरम पाण्याचे सेवन करा. रात्री खूप खोकला येत असल्यास, सुपारीच्या पानातून अर्धा चमचा ओवा चघळून त्याचा रस गिळून टाका. यामुळे खोकला बरा होतो.

मुलांमध्ये अंथरुणावर लघवी करण्याच्या समस्येवर उपचार

बहुतेक मुलांमध्ये रात्री अंथरुणावर लघवी करण्याची समस्या मोठी झाल्यावर देखील राहते. या समस्येवर उपचार म्हणून ओवा फायदेशीर ठरेल. रात्री झोपण्यापूर्वी त्यांना रोज एक चमचा ओव्याचं चूर्ण देत रहा. काही काळानंतर ही सवय नाहीशी होईल.

myupchar.comशी संबंधीत डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ल यांच्या म्हणण्यानुसार ओवांच्या सेवनाने शरीराला कुठलीच हानी होत नाही. मात्र काही लोकांना वाढत्या पित्ताची तात्पुरती समस्या भासू शकते. पोटाचा जुना आजार असल्यास ओव्याचं सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - ओवा फायदे,वापर आणि सहप्रभाव

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 15, 2020, 9:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading