Home /News /lifestyle /

सावधान! चायनिज पदार्थ खायला आवडतात? पण अजिनोमोटोमुळे होऊ शकतं मोठं नुकसान

सावधान! चायनिज पदार्थ खायला आवडतात? पण अजिनोमोटोमुळे होऊ शकतं मोठं नुकसान

अजीनोमोटोचं सेवन करत असाल तर सावधान. या रोगांना निमंत्रण तर देत नाही ना?

    मुंबई, 16 ऑगस्ट : चायनिज म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटतं. चमचमीत आणि चटपटीत खायचं तर चायनिज हा पर्याय आपण निवडतो पण त्यामध्ये वापरलं जाणार अजीनोमोटो किंवा इतर पदार्थांसोबत खायला वापरल्या जाणाऱ्या अजीनोमोटोमुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो याचा आपण विचार केलाय का? सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. मोमोसोबत अजीनोमोट खाल्ल्यामुळे तरुणाच्या पोटात स्फोट झाला. ह्या मेसेजची सत्यता अद्याप पडताळण्यात आली नाही मात्र खरंच अजीनोमोटोमुळे आपल्या शरीराला काय त्रास होऊ शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. अजीनोमोटो हे एक प्रकारची केमिकल प्रक्रिया करून तयार केलेला चटणी सारखा प्रकार आहे. त्याला MSC म्हणजेच Mono Sodium Glumate असंही म्हटलं जातं. याला अॅमिनो एसिड असही म्हटलं जातं. याचा वापर करून ते तयार केलं जातं म्हणून त्याला अजीनोमोटो असं म्हणतात. हे वाचा-चक्क 2 महिने त्याने Air Fryer मध्ये ठेवली सोन्याची चैन: कारण वाचून हेवा वाटेल अजीनोमोटोचा वापर चायनिज खाण्यात किंवा एखाद्या वस्तूला स्वाद वाढवण्यासाठी वापरतात. विशेषत: भात आणि न्यूडल्समध्ये याशिवाय बर्गर, पिझ्झा आणि अनेक तऱ्हेच्या मसाल्यांमध्येही याचा वापर केला जातो. याचा स्वाद मीठाप्रमाणे असतो. अधिक प्रमाणात सेवन केल्यानं आरोग्यावर वाईट परिणाम होतो. गर्भवती महिलांनी याचं सेवन कटाक्षानं टाळायला हवं. त्याचा परिणाम बाळावरही होण्याची शक्यता असते. याशिवाय मायग्रेन, अॅसिडिटी, अल्सर, निद्रानाश, डोकेदुखी आणि हृदयाचे आजार अशा अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा श्वसनासंबंधिचे विकार आणि अॅलर्जी देखील होऊ शकते. त्यामुळे सातत्यानं चायनिज किंवा अजीनोमोटोचं सेवन करत असाल तर सावधान. या रोगांना निमंत्रण तर देत नाही ना? याचाही एकदा विचार करायला हवा.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या