वायू प्रदूषणापासून स्वतःला वाचवण्यासाठी काय करावं आणि काय करू नये, एकदा वाचाच!

वायू प्रदूषणापासून स्वतःला वाचवण्यासाठी काय करावं आणि काय करू नये, एकदा वाचाच!

एकीकडे पाऊस थांबायचं नाव घेत नसला तरी वायू प्रदूषणही झपाट्याने वाढत आहे. दिल्लीमध्ये तर लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे.

  • Share this:

एकीकडे पाऊस थांबायचं नाव घेत नसला तरी वायू प्रदूषणही झपाट्याने वाढत आहे. दिल्लीमध्ये तर लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या एका पॅनलने दिल्ली- एनसीआरमध्ये 'पब्लिक हेल्थ इमरजन्सी' जारी केली आहे. अशात मुंबईमध्येही वायू प्रदूषणाचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. अशात वायू प्रदूषणापासून वाचण्यासाठी आपल्याकडे फार कमी पर्याय उपलब्ध आहेत. नेमकी ते पर्याय कोणते याची आज माहिती घेऊ...

वायू प्रदूषणापासून वाचण्यासाठी काय करावं-

- घरातील हवेची गुणवत्ता चांगली राहील याकडे लक्ष द्या. घरात शक्यतो एअर प्यूरीफायल लावा.

- पूर्ण शरीर झाकलं जाईल असे कपडे घाला आणि चेहराही चांगल्या मास्कने झाका. तसेच नियमित काळाने मास्क बदला.

- घरातच योग साधना करा. तसेच घरात नियमितपणे व्यायाम करा.

- घराच्या आसपास प्रदूषण कमी करण्यासाठी जास्त प्रमाणात झाडं लावा.

- प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आलं आणि तुळशीचा चहा प्या.

- दिवसभरात सतत पाणी पीत रहा. पाणी प्यायल्याने शरीराला प्रदूषणाचा धोका कमी होतो.

- दिवसभरात विटामिन सी, ओमेगा 3, मॅग्नेशियम, हळद, गुळ, अक्रोडसारखे पदार्थ खा.

- वायू शुद्ध करणारी रोपं लावा. हवेतील विषारी वायू रोखण्यासाठी काही रोपं फार उपयोगी होतात. खाज, जळजळ, सतत सर्दी होणं, अॅलर्जी आणि डोळ्यांची जळजळ यांपासून वाचण्यासाठी ही रोपं फायदेशीर आहेत.

काय करू नये-

- आपल्या गाडीतून येणारा धूर नियंत्रणात ठेवा. तसेच गाडीतील एअर फिल्टर नियमितपणे बदलण्यात येत आहे की नाही याकडेही लक्ष द्या.

- फटाके उडवू नका. तसेच कचरा जाळू नका.

- कोणी प्लॅस्टिक किंवा इतर कचरा जाळताना दिसत असेल तर त्यांना रोखा.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

जगातील सर्वात जास्त प्रदूषण पसरवणाऱ्या टॉप 5 कंपन्या, भारतातील या कंपनीचंही नाव

जाऊ तिथं कचरा करू; अमेरिकेत दिवाळीला रस्त्यावर उडवले फटाके, आणि...

डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही; 'या' उपायांनी दूर होईल घशातील खवखव

गिनीज बुकमध्ये तिरंग्याचा दबदबा; 80हून अधिक भन्नाट रिकॉर्ड भारतीयांच्या नावावर!

रॅम्प वॉक करताना पाकिस्तानी मॉडेल अडखळली आणि...; पाहा हा Viral Video

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2019 08:00 AM IST

ताज्या बातम्या