लंडन, 23 नोव्हेंबर : या महिन्यात झालेल्या जागतिक हवामानबदल परिषदेत (Climate change) हरितगृह वायूंचं उत्सर्जन (Greenhouse Gas Emission) रोखण्याची उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात आला. जगात सर्वत्र वायू प्रदूषण (Air pollution) गंभीर रूप धारण करत आहे. वायू प्रदूषणामुळे आजारी पडणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. अर्थात त्यामुळे मृतांचा आकडादेखील वाढत आहे. परंतु, फार कमी लोकांना माहिती असेल, की जगात आतापर्यंत केवळ एकाच व्यक्तीच्या मृत्यू दाखल्यावर (Death certificate) मृत्यूचं कारण म्हणून वायू प्रदूषणाचा उल्लेख करण्यात आला आहे. हे प्रकरण नेमकं काय होतं आणि ते आश्चर्यकारक कसं ठरलं ते जाणून घेऊ या.
अशी कोणतीही तरतूद नाही
एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मृत्यू दाखल्यावर मृत्यूचं कारण म्हणून वायू प्रदूषण असा उल्लेख करण्याची तरतूद जगातल्या कोणत्याही देशात नाही. परंतु, एकदा अशी विचित्र गोष्ट घडलेली आहे. 2013 साली ब्रिटनमधल्या (Britain) नऊ वर्षांच्या एका मुलीला गंभीर अस्थमा (Asthma) झाला. त्यानंतर मृत्यू दाखल्यावर तिच्या मृत्यूचं कारण वायू प्रदूषण असं लिहिण्यात आलं.
ऐतिहासिक निर्णय
ही नोंद लगेच झाली नाही. लंडनमध्ये राहणाऱ्या एला किसी डेबराह हिच्या मृत्यूनंतर 7 वर्षांनी, तिच्या मृत्यूचं कारण वायू प्रदूषण असल्याचं तिच्या मृत्यू दाखल्यावर लिहिण्याचा आदेश देण्यात आला. त्यानंतर एलाचा मृत्यू दाखला हे जगातलं असं पहिलं प्रकरण ठरलं, की ज्यात अधिकृतपणे असं मानलं गेलं, की तिचा मृत्यू वायू प्रदूषणामुळे झाला आहे.
Air pollution वर जपानी उपाय आजमावणार भारत? प्रदूषणापासून मिळू शकते .
दीर्घ काळ लढावी लागली कायदेशीर लढाई
जगभरात दर वर्षी वायू प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लाखो व्यक्तींसाठी एक प्रमुख ओळख म्हणून एलाचा मृत्यू दाखला काम करील, असा विश्वास व्यक्त केला जाऊ लागला. एलाची आई रोजामंड यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ब्रिटनमधल्या प्रदूषणाच्या समस्येविरोधात दीर्घ लढा दिला. 2014 साली तज्ज्ञांनी एलाच्या श्वसन यंत्रणेत (Respiratory System) बिघाड झाल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. रोजामंड यांनी दुसऱ्यांदा चौकशीची मागणी केली आणि शेवटी डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी लढाई जिंकली.
न्यायालयात काय सिद्ध झालं?
न्यायालयाच्या आदेशानुसार, एलाचा मृत्यू भलेही अस्थमामुळे फुफ्फुसं (Lungs) निकामी होऊन झाला असला तरी एलावर उपचार सुरू असताना लंडनमधलं वायू प्रदूषण हे युरोपियन युनियनच्या मानकांच्या तुलनेत जास्त धोकादायक पातळीवर होतं. एलाला तीन वर्षांत किमान 30 वेळा रुग्णालयात उपचारांसाठी भरती व्हावं लागलं.
Air Pollution In India : हवा प्रदूषणाचा भारतीयांच्या आयुर्मानावर गंभीर परिणाम
न्यायालयानं प्रथमच मान्य केलं
या प्रकरणात न्यायालयानं (Court) जो निकाल दिला त्यात स्पष्टपणे कबूल केलं, की एलाच्या मृत्यूचं प्रमुख कारण वाहतुकीमुळे होणाऱ्या उत्सर्जनाचा तिला झालेला त्रास हे होतं. त्यामुळे ही जगातली पहिली आणि एकमेव घटना आहे. जगभरात दरवर्षी वायू प्रदूषणामुळे लाखो नागरिकांचा मृत्यू होतो. परंतु, मृत्यू दाखल्यावर मृत्यूचं कारण वायू प्रदूषण नोंदल्याची ही पहिलीच वेळ होती.
जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार, दरवर्षी वायू प्रदूषणामुळे 70 लाख व्यक्तींचा मृत्यू होतो. ज्या हवेमुळं एलाचा मृत्यू झाला, त्या हवेमुळे स्ट्रोक, हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग आणि दीर्घ श्वसनाचे आजार होतात. या कारणाने दरवर्षी 42 लाख नागरिक मृत्युमुखी पडतात. दिल्लीसारख्या शहरात तर यंदा आणीबाणी लागू करण्याची वेळ आली आहे.
Air Pollution : हवा प्रदूषणामुळे दरवर्षी होत आहेत 70 लाख मृत्यू
हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, जगभरातल्या दर 5 मृत्यूंपैकी एकाचा मृत्यू वायू प्रदूषणामुळे होतो. 2017 पर्यंत दरवर्षी जगभरात 50 लाख नागरिकांचा मृत्यू वायू प्रदुषणामुळे झाला आणि जगातल्या एकूण मृत्यूंपैकी त्या मृत्यूंचं प्रमाण 9 टक्के आहे, असं एका संशोधनातून स्पष्ट झालं आहे. असं असूनदेखील अजूनही मृत्यू दाखल्यावर मृत्यूचं कारण वायू प्रदूषण असल्याचं नोंदलं जात नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Air pollution, Death, Pollution