Home /News /lifestyle /

शहरी नागरिकांना का येतोय Heart attack? संशोधनात समोर आलं धक्कादायक कारण

शहरी नागरिकांना का येतोय Heart attack? संशोधनात समोर आलं धक्कादायक कारण

वायू प्रदूषणामुळे (Air pollution) फक्त फुफ्फुसच (Lung) नव्हे तर हृदयावरही (Heart) परिणाम होतो, हे नुकत्याच झालेल्या संशोधनात दिसून आलं आहे.

    मुंबई, 18 फेब्रुवारी : हार्ट अटॅक (Heart attack) म्हटलं की, आपण आहार आणि जीवनशैलीत बदल करतो. मात्र तरीदेखील शहरी भागातील लोकांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण अधिक आहे आणि याला कारणीभूत आहे ते वायू प्रदूषण (Air pollution). वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसांसंबंधी आजार होतात हे आपणा सर्वांना माहिती आहे, मात्र वायू प्रदूषणामुळे फक्त फुफ्फुसच नव्हे तर हृदयावरही परिणाम होतो, हे नुकत्याच झालेल्या संशोधनात दिसून आलं आहे. अभ्यासानुसार वायू प्रदूषणाच्या संपर्कात राहिल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो. इन्वायरमेन्टल हेल्थ पर्सपेक्टिव्ह (Environmental Health Perspectives) या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. वायू प्रदूषणाचे सूक्ष्म कण हृदयरोग विकसित करण्यात कारणीभूत ठरतात, असं संशोधकांना दिसून आलं. संशोधकांच्या मते, प्रदूषणाच्या अगदी सूक्ष्म कणांच्या संपर्कात आल्याने काही तासांतच हृदयावर दुष्परिणाम व्हायला सुरुवात होते. संशोधनानुसार बारीक कण आकाराने 100 नॅनोमीटरपेक्षाही लहान असतात. शहरी भागात गाड्यांमुळे हे बारीक कण तयार होतात, जे श्वासाच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतात. ज्यामुळे मायोकार्डियल इन्फॅर्कशनचा (Myocardial infarction) धोका वाढतो. मायोकार्डियल इन्फॅर्कशनचा ज्याला हार्ट अटॅक म्हणून ओळखलं जातं. यामध्ये हृदयाच्या काही भागांमध्ये रक्तप्रवाहात अडथळे येतात, ज्यामुळे हृदयाच्या पेशी मरतात. हेदेखील वाचा - पुरुषांपेक्षा महिलांना ‘या’ कॅन्सरचा सर्वाधिक धोका, लक्षणांबाबत माहिती असू द्या मेंदूच्या पेशीही होतात कमजोर या संशोधनानुसार प्रदूषणाचे सूक्ष्म कण हृदयरोग विकसित करतात. तर याआधी झालेल्या एका संशोधनानुसार, वायू प्रदूषणाचा अधिक स्तर मेंदूसाठी हानिकारक असतात. वायू प्रदूषणामुळे मेंदूच्या संरचनेत बदल होण्याची शक्यता असते. अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक आजारांचा धोका असतो. वायू प्रदूषणापासून कसं वाचाल? घराबाहेर पडताना पूर्ण शरीर झाकलं जाईल असे कपडे घाला. तोंडावर चांगल्या दर्जाचं मास्क लावा. घराची दारं-खिडक्या बंद करा, जेणेकरून प्रदूषणाचे कण घरात येणार नाहीत. आहारात व्हिटॅमिन सी, ओमेगा ३ आणि मॅग्नेशिअम, हळद, गूळ इत्यादी पदार्थांचा समावेश करा, जेणेकरून शरीरात प्रवेश केलेल प्रदूषणाचे कण आपल्याला हानी पोहोचवणार नाहीत. हेदेखील वाचा - BP चा त्रास, आता नो टेन्शन; ‘हे’ पदार्थ कमी करतील तुमचं वाढलेलं ब्लडप्रेशर
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Air pollution, Health, Heart attack, Lifestyle

    पुढील बातम्या