नवी दिल्ली, 08 जानेवारी : भारतातील महिला पायलट (women pilots) एक नवा इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. जगातील सर्वात लांब आणि आव्हानात्मक हवाई मार्गावर त्या झेप घेणार आहेत. उत्तर धुव्रवरून (north india) एअर इंडियाच्या (Air india) लेडी कॅप्टन उड्डाण भरणार आहे. फक्त एअर इंडिया कंपनीसाठीच नव्हे तर भारतासाठी ही अभिमानास्पद अशी बाब आहे.
एअर इंडियाचं विमान सॅन फ्रान्सिकोहून बंगळुरूला उड्डाण भरणार आहे. जगातील हा सर्वात लांब हवाई मार्ग आहे. तब्बल 16,000 किलोमीटरचं हे अंतर आहे. 9 जानेवारीला हे विमान बंगळुरूला पोहोचेल. या विमानाच्या कॅप्टन महिला आहेत. पहिल्यांदाच इतक्या लांब आणि आव्हानात्मक हवाई मार्गाची धुरा महिला कॅप्टनच्या हातात देण्यात आली आहे.
Air India women pilots set to script history by flying over North Pole on world's longest air route
एनडीटीच्या वृत्तानुसार एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, उत्तर ध्रुवच्या वरून उड्डाण करणं खूप आव्हानात्मक आहे. एअरलाइन्स कंपन्या या मार्गावर अनुभवी आणि सर्वोत्तम पायलटनाच पाठवतात. यावेळी महिला कॅप्टनला सॅन फ्रान्सिकोहून बंगळुरू जाणाऱ्या ध्रुवीय मार्गाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
ANI च्या रिपोर्टनुसार, कॅप्टन जोया अग्रवालनं संगितलं, "एका पायलटसाठी हे एक स्वप्न आहे, जे प्रत्यक्षात साकारतं आहे. माझ्या टीममध्ये पापागारी, आकांक्षा सोनावने आणि शिवानी मन्हास यांसारख्या अनुभवी कॅप्टन आहेत, याचा मला खूप अभिमान वाटतो. पहिल्यांदाच पायलटची अशी टीम उत्तर ध्रुवच्या वरून उड्डाण करणार आहे. ज्यामध्ये फक्त महिला असतील. हा एक इतिहास रचला जाईल"