ऑफिसच्या AC मुळे शरिरातील या भागांचं होतं नुकसान; अशी घ्या काळजी!

ऑफिसच्या AC मुळे शरिरातील या भागांचं होतं नुकसान; अशी घ्या काळजी!

सगळ्या गोष्टी माहीत असूनही अनेकदा ऑफिसमध्ये एसीत बसावं लागतं. अशावेळी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली तर केसांचं आणि त्वचेचं नुकसान होणार नाही.

  • Share this:

एकीकडे पावसाच्या दिवसांत कपडे ओले असल्यामुळे एसीचा फायदा होतो. पण एसीच्या हवेमुळे त्वचेचं आणि केसांचं मोठं नुकसान होतं. पावसाळ्यात एसीत जास्तवेळ बसल्यामुळे तुमच्या त्वचेचं आणि केसांचं नुकसान होतं. त्वचा आणि केस नाजूक आणि सतेच राहण्यासाठी ओलाव्याची गरज असते. पण नेमकी हीच गोष्ट एसी आपल्या केसांमधून आणि त्वचेतून शोषून घेतं. मॉइश्चर कमी झाल्याने त्वचा निस्तेज आणि केस कमकूवत होतात.

अनेक ऑफिसमध्ये एसीचं तापमान जाणीवपूर्वक कमी करण्यात येतं. अशावेळी त्यांची त्वचा आणि केस दोन्ही खराब होतात. ओल्याव्याच्या अभावी चेहऱ्याचा रंगही बदलू लागतो. ज्यामुळे तुम्ही वयाच्याआधीच वृद्ध दिसायला लागता. चेहऱ्याचं ग्लॅमर संपू लागतं. याशिवाय केसांमध्ये गुंता होऊ लागतो आणि केस अधिक प्रमाणात गळतात. हे सगळं माहीत असूनही ऑफिसमध्ये एसीतच बसावं लागतं. अशावेळी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली तर केसांचं आणि त्वचेचं नुकसान होणार नाही.

त्वचेतला सतेजपणा टिकवून ठेवायचा असेल तर एसीचा वापर कमीत कमी करा. त्यातही एसीत बसणं अनिवार्य असेल तर सतत पाणी पीत रहा. पाणी शरीरातील अनेक गोष्टींवर नियंत्रण मिळवतं. सतत मॉइश्चरायझर आणि सीरमचा वापर करा. यामुळे त्वचा ड्राय होणार नाही. हातांना लोशन लावा. सतेच त्वचेसाठी फक्त पाणी पिणंच पुरेसं नाही तर डाएटमध्ये फळ आणि भाज्यांचाही समावेश करणं आवश्यक आहे.

अशी फळं खा ज्यात पाण्याची मात्रा जास्त असेल. केसांच्या संरक्षणासाठी मुळांना एरोवेरा जेल लावा आणि केस मॉइश्चराइज ठेवा. यासोबतच नारळाचं किंवा ऑलिव ऑइलने केसांचा चांगला मसाज करा. आठवड्यातून एकदा केसांचा मसाज करणं आवश्यक आहे. ऑफिसमध्ये असताना थोड्या वेळासाठी एसीतून बाहेर या. यामुळे त्वचा आणि केसांना मॉइश्चर मिळतं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

निष्काळजीपणाचा कळस!डॉक्टरांची मोठी चूक,सहाव्या महिन्यात भंगलं आई होण्याचं स्वप्न

टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाणं वेळीच थांबवा, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप!

आयुर्वेदानुसार जाणून घ्या जेवणात कसं, कधी आणि काय खावं...

आजच मोडा जेवणानंतर पाणी पिण्याची सवय, होतील गंभीर आजार

VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं

First published: September 25, 2019, 3:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading