मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /मनासारखा नवरा मिळेना म्हणून तरुणी थेट पोलीस ठाण्यात; स्वत:च्याच कुटुंबाविरोधात दिली तक्रार

मनासारखा नवरा मिळेना म्हणून तरुणी थेट पोलीस ठाण्यात; स्वत:च्याच कुटुंबाविरोधात दिली तक्रार

तिनं कित्येक स्थळं पाहिली पण तिला जसा हवा तसा आयुष्याचा जोडीदारच मिळत नव्हता.

तिनं कित्येक स्थळं पाहिली पण तिला जसा हवा तसा आयुष्याचा जोडीदारच मिळत नव्हता.

तिनं कित्येक स्थळं पाहिली पण तिला जसा हवा तसा आयुष्याचा जोडीदारच मिळत नव्हता.

आग्रा, 11 जानेवारी : प्रत्येक तरुणी आपल्या आयुष्याच्या जोडीदाराबाबत (life partner) स्वप्नं रंगवते. आपल्याला असा नवरा हवा, तसा नवरा हवा असं बरंच काही तिनं मनात ठरवलेलं असतं. अशाच एका राजकुमाराच्या शोधात ती असते. आग्रातील (agra) तरुणीदेखील तिला जसा हवा तसाच नवरा शोधत होती. पण तो तिला काही सापडला नाही आणि मनासारखा नवरा मिळाला नाही म्हणून ती तरुणी थेट पोलीस ठाण्यातच गेली.

आगरा के एत्माद्दौला पोलीस ठाण्यात एका तरुणीनं तक्रार दिली आहे. आपल्याला हवा तसा नवरा मिळत नाही, त्यामुळे आपल्याला लग्न करायचं नाही. पण तरी कुटुंब जबरदस्तीनं लग्न लावतं आहे, असं म्हणत कुटुंबाविरोधात तरुणी पोलीस ठाण्यात पोहोलची.

मीडिया रिपोर्टनुसार तरुणीला जसा हवा तसा आयुष्याचा जोडीदार मिळत नव्हता म्हणून तिनं अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. आपण लग्न करणार नाही, हा निर्णय तिनं आपल्या कुटुंबालाही सांगितला. तरी तिच्या कुटुंबानं तिच्यासाठी तिसरं स्थल पाहिलं, तरुणीनं त्याला नकार दिला. त्यामुळे तिच्या कुटुंबानं तिला मारहाण केली.

हे वाचा - गर्लफ्रेंडला घरातून पळवून नेण्यासाठी आला होता तरुण; तिच्या आईलाही सोबत नेलं

मग काय तरुणी संतप्त झाली आणि तिनं थेट पोलीस ठाण्यातच धाव धेतली. तरुणीनं सांगितलं, तिच्या कुटुंबानं जो पहिला मुलगा पसंत केला होता तो तिला सुरुवातीला डेटिंगसाठी जबरदस्ती करू लागला. त्यामुळे त्याच्यासोबत तिनं नातं तोडलं. दुसरं स्थळ पाहिलं होतं, तिथं ते कार मागू लागले म्हणून तिनं ते स्थळही नाकारलं. जो तरुण तिच्यावर प्रेम करत नाही, त्याच्याशी तिला लग्नच करायचं नव्हतं.  दोन नाती तुटल्यानंतर तिनं लग्नालाच नकार दिला तरी तिच्या कुटुंबानं तिसरं स्थळ पाहिलं. तिनं याला विरोध केला तेव्हा तिचे भाऊ आणि बहिणीच्या नवऱ्यानं मिळून तिला मारलं.

हे वाचा - पत्नीला चंद्र-तारे नकोत! पतीने नेमकं ओळखून केलं अनोखं काम, देशभरात होतंय कौतुक

नातेवाईकांची तक्रार करायला पोलीस ठाण्यात गेलेल्या तरुणीची पोलिसांनी समजूत काढली आणि तिला घरी पाठवून दिलं आणि तिच्या नातेवाईकांनाही तिच्यासोबत पुन्हा असं न वागण्याची तंबीही दिली.

First published:
top videos

    Tags: Relationship, Wife and husband