आग्रा, 26 ऑक्टोबर : ताजनगरी आग्रामध्ये (Agra), कोरोना काळात (COVID-19) एका इंजिनीअरने मातीशिवाय, केवळ पाण्यात भाजीपाला लागवड करण्यास सुरुवात केली आहे. पाण्यातील नियंत्रित हवामानात मातीशिवाय वनस्पती वाढवण्याच्या तंत्राला हायड्रोपोनिक (Hydroponic) म्हणतात. हे तंत्र मोठ्या प्रमाणात इस्राईलमध्ये अवलंबलं जातं. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये आग्राच्या नामनेर येथील रहिवासी अरुण अग्रवाल यांनी पाण्यात भाजीपाला लागवड करण्यास सुरवात केली. पाईपमध्ये, पाण्याच्या सतत प्रवाहात टोमॅटो, भेंडी, कारलं, कोथिंबीर, गवार या भाज्यांची त्यांनी आपल्या बागेत लागवड केली आहे.
अरुण अग्रवाल हे व्यवसायाने इंजिनीअर आहेत, परंतु कोरोना काळात लॉकडाउन झालं आणि त्यावेळी घरी बसून पाण्यात अशाप्रकारे, शेती करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. काही दिवसांच्या मेहनतीचं फळ आता समोर असून अग्रवाल यांनी अवलंबलेल्या तंत्रज्ञानामुळे रोपट्यांना आता भाज्याही आल्या आहेत. पाइपमध्ये, मातीशिवाय केलेली भाजीची लागवड पाहण्यासाठी दूरदूरहून अनेक लोक येत आहेत.
(वाचा - सर्वसामान्यांना फटका! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार; आता हे आहे कारण)
हायड्रोपोनिक्स म्हणजे काय?
हायड्रोपोनिक्स एक तंत्र आहे, ज्याद्वारे शेतात पेरणी न करता केवळ पाणी आणि पोषक द्रव्यं देऊन पिकं घेतली जातात. रोपटं वाढवण्याचं हे तंत्र पर्यावरणासाठी अगदी योग्य आहे. या झाडांना कमी पाण्याची आवश्यकता असते, ज्यामुळे पाण्याची बचत होते. या हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने भाजीपाला पिकवता येत असून त्यासाठी केवळ सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते.
(वाचा - FAU-G चा टीजर पाहून PUBG ला विसराल! मॅपमध्ये दिसणार भारतातील हे ठिकाण)