News18 Lokmat

दुपारची डुलकी काढा बिनधास्त, 'इतके' होतात फायदे

संशोधनातून हे सिद्ध झालंय की दुपारची झोप आरोग्यासाठी चांगली असते.

News18 Lokmat | Updated On: Mar 16, 2019 03:11 PM IST

दुपारची डुलकी काढा बिनधास्त, 'इतके' होतात फायदे

मुंबई, 16 मार्च : अनेकदा दुपारच्या जेवणानंतर आपल्याला झोप यायला लागते. त्यावेळी काहींना उगाचंच अपराधी वाटत राहातं. पण संशोधनातून हे सिद्ध झालंय की दुपारची झोप आरोग्यासाठी चांगली असते.

थोड्या वेळ काढलेल्या डुलकीमुळे  हायपरटेंशन कमी होतं. तुमची शरीरातली उर्जा वाढते. तुमचा मूडही चांगला होतो.

दुपारच्या डुलकीमुळे वाढलेला रक्तदाब कमी होतो. तो 3mm Hgनं कमी होतो, असं डाॅक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता खूपच कमी होते. डाॅक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे ती 10 टक्के होते.

दुपारी झोप घ्यावी की नाही यावर खूप मतभेद होते. पण आता तुम्ही निश्चिंत व्हायला हरकत नाही. तुम्ही 15 ते 30 मिनिटाची झोप काढलीत तर तुमच्या अंगातला आळस निघून जातो. मेंदू शार्प होतो.

तुम्हाला जास्त थकावट जाणवत असेल तर तज्ज्ञांच्या माहितीनुसार तुम्ही 90 मिनिटं दुपारची झोप काढा. पण त्याहून जास्त नको. कारण 90 मिनिटांनंतर डीप स्लीप लागते. आणि त्यातून उठणं त्रासदायक होऊ शकतं.

Loading...

मध्यंतरी 'नासा'ने पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठाच्या मदतीने हा अभ्यास केला आहे. अंतराळात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना झोपेचा कसा फायदा होतो यावर आणि एकूणच माणसांच्या झोपेविषयी हा अभ्यास करण्यात आला. रात्रीची गाढ झोप आणि दिवसातली एखादी 'डुलकी' यावर 10 दिवस प्रयोगशाळेत अभ्यास करण्यात आला.

91 जणांची एक टीम 10 दिवस प्रयोगशाळेत राहायला आली होती. या 91 जणांना विभागून झोपेच्या विविध 18 वेळा देण्यात आल्या होत्या. दहा दिवस संशोधन करून शास्त्रज्ञांनी काही निष्कर्ष काढले आहेत. रात्रीची 6-8 तासांची गाढ झोप झाल्यावरही दुपारी 1 ते 3 दरम्यान एखादी 'डुलकी' घेतल्यास जास्त ताजंतवानं वाटतं. मेंदूला तरतरी येते, असं आढळून आलंय.VIDEO: आमिर खान 'या' ऑस्कर विजेत्या हॉलिवूड सिनेमाच्या रिमेकमध्ये झळकणार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 16, 2019 03:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...