Home /News /lifestyle /

बापरे! KGF Chapter 2 च्या Rocky bhai मुळे झाली भयंकर अवस्था; रुग्णालयात पोहोचला 15 वर्षांचा मुलगा

बापरे! KGF Chapter 2 च्या Rocky bhai मुळे झाली भयंकर अवस्था; रुग्णालयात पोहोचला 15 वर्षांचा मुलगा

केजीएफ चॅप्टर 2 (KGF Chapter 2) मधील रॉकी भाईला पाहून 15 वर्षांच्या मुलाने असं खतरनाक पाऊल उचललं की त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.

    तेलंगणा, 28 मे : गेल्याच महिन्यात केजीएफ चॅप्टर 2 (KGF Chapter 2)  फिल्म रिलीज झाली. या फिल्मसोबत या फिल्ममधील रॉकी भाईने सर्वांना वेड लावलं आहे. याच रॉकी भाईमुळे एका 15 वर्षांच्या मुलाची अवस्था इतकी भयंकर झाली की त्याला थेट रुग्णालयातच दाखल करण्याची वेळ आली. फिल्म पाहिल्यानंतर या मुलाने असं पाऊल उचललं की त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं (15 year old boy admitted in hospital after watching KGF Chapter 2) . हैदराबादच्या बंजाराहिल्समधील हे प्रकरण आहे. फिल्म रिलीज झाल्यानंतर दोन आठवड्यांनी हा मुलगा फिल्म पाहण्यासाठी गेला. त्याने  दोन दिवसांत तीन वेळा ही फिल्म पाहिली. फिल्ममधील रॉकी भाईमुळे तो इतका प्रभावित झाला की त्याला आपणही त्याच्यासारखं व्हावं असं वाटू लागलं. रॉकी भाईसारखा तो वागू लागला. अगदी त्याच्यासारखं स्मोकिंगही करू लागला. रॉकी भाईला पाहून त्याने इतक्या कमी वयात पहिल्यांदाच स्मोकिंग केलं. पण इतकं स्मोकिंग केलं की त्याची प्रकृती ढासळली. हे वाचा - Barbie Doll सारखं दिसण्यासाठी 4 ब्रेस्ट सर्जरी, 42 लाख उधळले; मॉडेलचा अवतार पाहून कुटुंबानेच तोडले संबंध सिगारेट ओढल्यानंतर सुरुवातीला त्याला खोकला लागला. त्यानंतर घशात वेदना होऊ लागल्या. त्याच्या कुटुंबाने तात्काळ त्याला खागसी रुग्णालयात नेलं.  ज्या रुग्णालयात या मुलाला दाखल करण्यात आलं त्या सेंचुरी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सिगारेटमुळेच त्याची अवस्था असं झाल्याचं सांगितलं. आज तकच्या वृत्तानुसार हॉस्पिटलमधील डॉ. रोहित रेड्डू यांनी सांगितलं, बऱ्याच वेळा लोक फिल्ममधील अभिनेता-अभिनेत्रींच्या भूमिकांमुळे प्रभावित होतात. त्यांच्यासारखं बनवण्यासाठी त्यांची नक्कल करू लागतात. पण काही वेळा हेच पाऊल भारी पडतं. फिल्म दिग्दर्शकांनी अशा गोष्टी फिल्ममध्ये दाखवू नये, ज्याचा लोकांच्या आयुष्यावर परिणाम होईल. फिल्ममध्ये धूम्रपान, तंबाथू इत्यादी. दाखवण्यावर बंदी असायला हवी. गेल्या आठवड्यात या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्याची प्रकृती ठिक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle

    पुढील बातम्या