नवी दिल्ली, 17 जानेवारी : थंडीच्या मोसमात थंड वाऱ्यामुळं चेहऱ्यावरील ओलावा निघून जातो. त्यामुळं हिवाळ्यात (Winter skin care) त्वचेची अधिक काळजी घेण्याची गरज असते. अशा परिस्थितीत, सकाळी उठल्यानंतर काही खास उपायांचा अवलंब केल्यास त्वचेची हरवलेली चमक तर परत येऊ शकते. शिवाय, त्यातील ओलावा टिकवून ठेवता येतो. जाणून घ्या तुम्हाला त्वचेचा चमकदारपणा पुन्हा मिळवून देऊ शकणाऱ्या अगदी (Skin care TIPS) सोप्या स्टेप्स..
स्टेप 1
तुमची त्वचा सुंदर आणि मुलायम बनवण्यासाठी आधी स्किन स्टीमिंग (त्वचेला वाफ द्या) करा. वाफेमुळं त्वचेची छिद्र मोकळी होऊन त्वचा खोलवर स्वच्छ होते.
सर्व प्रथम एका भांड्यात कोमट पाणी घ्या.
त्यात गुलाबाच्या पाकळ्या आणि गुलाबाची पाने घाला.
आता या पाण्यात स्वच्छ कपडा भिजवून चांगला पिळून घ्या.
नंतर आपली त्वचा हलक्या हातांनी स्वच्छ करा.
या कापडानं तुमची त्वचा 3 मिनिटं हलक्या हातांनी स्वच्छ करा.
असं केल्यानं तुम्ही त्वचेवरील अस्वच्छता साफ करू शकाल, अशी माहिती
झी न्यूजनं दिली आहे.
स्टेप 2
आता या वाफेनंतर त्वचेला 5 मिनिटं चांगला मसाज करा. वाफ घेतल्यानंतर त्वचेला मसाज केल्यानं रक्ताभिसरण तर वाढतंच. शिवाय, त्वचेतील अस्वच्छताही निघून जाते. मसाज करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल किंवा तिळाचं तेल वापरू शकता.
स्टेप 3
तिसऱ्या स्टेपमध्ये त्वचा एक्सफोलिएट (चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकणं) करणं. स्टीम आणि मसाज केल्यानंतर त्वचेला स्क्रबचा वापर करून एक्सफोलिएट करणं आवश्यक आहे. असं करण्यासाठी आपली त्वचा हलक्या हातांनी स्वच्छ करा आणि मृत त्वचेपासून मुक्त व्हा. लक्षात घ्या की जर तुम्ही त्वचा एक्सफोलिएट करणार असाल तर प्रथम सौम्य साबण किंवा फेसवॉशच्या मदतीने चेहरा पूर्णपणे धुवा आणि त्यानंतर त्वचा स्क्रब करा. आता चेहरा धुवा.
हे वाचा -
Winter Health Tips: हिवाळ्यात तुमचीही बोटं सुन्न होतात? जाणून घ्या त्याची कारणे आणि घरगुती उपाय
स्टेप 4
त्वचेला वाफ घेणं, मसाज करणं, मृत त्वचा काढून टाकणं या स्टेप्स केल्यानंतर त्वचेवर मॉइश्चरायझर वापरणंदेखील महत्त्वाचं आहे. त्वचेवर मॉइश्चरायझर वापरल्यानं त्वचा मऊ तर होतेच. शिवाय, त्वचेचा हरवलेला ओलावाही परत मिळू शकतो. कोणत्याही मॉइश्चरायझरचा वापर करून तुम्ही तुमच्या त्वचेला 2 मिनिटं हलक्या हातांनी मसाज करू शकता.
हे वाचा -
Cholesterol Controlling Fruits: वाढलेलं कोलेस्ट्रॉल आणायचंय नियंत्रणात; तुमच्यासाठी संजीवनी ठरती ही 5 फळं
याची काळजी घ्या
जर तुम्हाला त्वचेशी संबंधित काही समस्या असतील, तर वर नमूद केलेल्या स्टेप्स सुरू करण्यापूर्वी एकदा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.