कोरोना लशीत रशियाने मारली बाजी! 2 महिन्यांतच लाँच करणार दुसरी CORONA VACCINE

कोरोना लशीत रशियाने मारली बाजी! 2 महिन्यांतच लाँच करणार दुसरी CORONA VACCINE

Sputnik V नंतर EpiVacCorona लशीची नोंदणी करण्यासाठी रशियाने हालचाली सुरू केल्या आहेत.

  • Share this:

मॉस्को, 04 ऑक्टोबर : जगभरात कोरोना लशीचं (corona vaccine) ट्रायल सुरू असताना रशियाने या लशीच्या स्पर्धेत बाजी मारली आहे.  Sputnik V लस लाँच करून रशियाने सर्वांनाच धक्का दिला. आता रशिया दुसरी कोरोना लस (russian corona vaccine) लाँच करण्याच्या तयारी आहेत. रशियाची एपिवॅककोरोना  (EpiVacCorona) लस तयार झाली आहे. क्लिनिकल ट्रायलमध्ये ही लस यशस्वी ठरल्याचा दावा रशियाने केला आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत ही लस लाँच होण्याची आशा आहे.

सायबेरियातील व्हेक्टर स्टेट व्हायरोलॉजी रिसर्च सेंटरने (Vector State Research Center of Virology and Biotechnology) ही लस तयार केली आहे. रिसर्च सेंटरच्या मते, एपिवॅककोरोना लस ट्रायलच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. TASS या रशियन वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिलं आहे.

30 सप्टेंबरला या लशीचं क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाल्याचं सांगण्यात आलं आहे. आता लशीच्या नोंदणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. 15 ऑक्टोबरपर्यंत ही लस लाँच होईल आणि नोंदणीनंतरचं क्लिनिकल ट्रायल सुरू होणार आहे, असं सांगितलं जातं आहे.

हे वाचा - भारतात कधी आणि कुणाला मिळणार कोरोना लस? केंद्रीय आरोग्यमंत्री काय म्हणाले पाहा

या लशीची नोंदणी होताच सायबेरियातील  5,000 लोकांवर या लशीचं क्लिनिकल ट्रायल सुरू केलं जाईल. ऑक्टोबरअखेरपर्यंत लशीचे 10,000 डोस तयार केले जातील. नोव्हेंबर-डिसेंबर, 2020 पर्यंत हे ट्रायल सुरू होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

याआधी रशियाने ऑगस्टमध्ये Sputnik V लस लाँच केली आणि कोरोना लस आणणारा रशिया जगातील पहिला देश ठरला. आता रशिया दुसरी कोरोना लस EpiVacCorona लाँच करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या कोरोना लशीचे जे साइड इफेक्ट दिसले होते, ते दुसऱ्या लशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत दिसले नाहीत, असं याआधी रशियाच्या टेलिव्हिजनवर प्रदर्शित केलेल्या एका सरकारी बैठकीत गोलिकोवा यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सांगितलं होतं.

Published by: Priya Lad
First published: October 4, 2020, 5:12 PM IST

ताज्या बातम्या