प्रेग्नंसीनंतर आलेलं डिप्रेशन तुमच्या बाळासाठीही ठरेल घातक; हे सोपे उपाय करा !

प्रेग्नंसीनंतर आलेलं डिप्रेशन तुमच्या बाळासाठीही ठरेल घातक; हे सोपे उपाय करा !

सामान्य स्त्रियांनाच नाही तर डिलिव्हरीनंतर (Delivery) अभिनेत्रींना सुद्धा डिप्रेशनचा सामना करावा लागतो. डिलेव्हरीनंतर अभिनेत्री समीरा रेड्डी (Samira Reddy) बराच काळ डिप्रेशनमध्ये होती.

  • Share this:

मुंबई, 20 डिसेंबर: आई होणं ही जगातील सगळ्यात सुंदर भावना आहे. आई आपल्या बाळाला तिच्या पोटात 9 महिने वाढवते आणि दरम्यान त्याच्यावर संस्कार करते. प्रेग्नन्सी (Pregnancy) दरम्यान प्रत्येक महिन्यात स्त्रियांमध्ये वेगवेगळे बदल होताना दिसतात. थकवा जाणवतो, कधी उलट्या तर कधी एखादा पदार्थ खाण्याचा मोह होतो. 9 महिने एका जीवाचा सांभाळ करणं हे प्रत्येक स्त्रीसाठी एक आव्हान असतं.

9 महिने बाळाची काळजी घेतल्यावर डिलेव्हरीनंतर (Delivery) स्वतःची काळजी घेणं महत्वाचं असतं. डिलिव्हरीनंतर स्त्रियांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. हार्मोनल (Hormonal), शारीरिक (Physical) किंवा मानसिक (Mental) बदलांचं आव्हान स्त्रियांना पेलायचं असतं. स्त्रिया त्यांच्या शारीरिक आरोग्याकडे बऱ्यापैकी लक्ष देतात पण मानसिक आरोयाग्याला मात्र कुणीही फारसं महत्व देत नाही. मानसिक अस्वस्थता जाणवल्यास आपण कधीही सायकॅट्रीस्टकडे (Psychiatrist) किंवा कॉऊन्सिलर (Councilor) बरोबर कन्सल्ट केल्याचं दिसून येत नाही. म्हणून डिलेव्हरीनंतर बऱ्याच स्त्रिया डिप्रेशनमध्ये जाऊ शकतात. डिलेव्हरीनंतर येणाऱ्या या डिप्रेशनला 'पोस्टपार्टम डिप्रेशन' (Postpartum Depression) असं म्हणतात. गरोदरपणानंतर आलेलं डिप्रेशन तुमच्या बाळासाठीही घातक ठरू शकतं.

पोस्टपार्टम डिप्रेशन होण्यामागची करणे

पोस्टपार्टम डिप्रेशन होण्यामागे विविध करणे असू शकतात. डिलेव्हरीनंतर काही स्त्रियांच्या त्वचेमध्ये वाईट बदल घडतो, काहींचे केस गळतात (Hair Fall) तर कुणाला स्ट्रेच मार्क्स येतात. प्रामुख्याने डिलेव्हरी नंतर बऱ्याच स्त्रियाच्या वजनामध्ये मोठा फरक पडताना दिसतो.  डिलिव्हरीनंतर हे सगळे बदल बघून बरेचदा लोक स्त्रियांनाच बारीक होण्याचे सल्ले देतात. म्हणून स्त्रिया बाहेर जण टाळतात आणि गेल्या बरेच महिन्यांपासून कुठल्याही बदलाशिवाय सारख्या पद्धतीने आयुष्य जगल्यामुळे स्त्रियांना डिप्रेशन येऊ शकतं.

तसेच कमी वयात आई होणे, गरोदर न राहण्याची इच्छा होणे, जास्त मुलांना जन्म देणे, डिप्रेशनची हिस्ट्री असणे, कोणाचाच मानसिक आधार नसणे, एकटेपणाची (Loneliness) भावना आणि पती पत्नीमध्ये मतभेद असणे, एस्‍ट्रोजन आणि प्रोजेस्‍टेरोन हार्मोन मध्ये कमतरता येणे, झोप पूर्ण न होणे ही देखील पोस्टपार्टम डिप्रेशनची करणं असू शकतात.

पोस्टपार्टम डिप्रेशनवरील  रामबाण उपाय :  

1. नियमित व्यायाम करणे

2. मेडिटेशन वा योग करणे

3. सकस आहार घेणे

4.आपल्या आवडीच्या व्यक्ती बरोबर वेळ घालवणे

5. मद्यपान व धुम्रपान न करणे

6. पुरेशी झोप घेणे

Published by: News18 Desk
First published: December 20, 2020, 6:54 PM IST

ताज्या बातम्या