मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मलायका अरोरानंतर अर्जुन कपूरनेही केली कोरोनावर मात; चाहत्यांना केली कळकळीची विनंती

मलायका अरोरानंतर अर्जुन कपूरनेही केली कोरोनावर मात; चाहत्यांना केली कळकळीची विनंती

अभिनेता अर्जुन कपूरनेही (Arjun Kapoor) तब्बल एक महिना कोरोनाशी झुंज दिली. यानंतर त्याने आपला अनुभव मांडला आहे.

अभिनेता अर्जुन कपूरनेही (Arjun Kapoor) तब्बल एक महिना कोरोनाशी झुंज दिली. यानंतर त्याने आपला अनुभव मांडला आहे.

अभिनेता अर्जुन कपूरनेही (Arjun Kapoor) तब्बल एक महिना कोरोनाशी झुंज दिली. यानंतर त्याने आपला अनुभव मांडला आहे.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 07 ऑक्टोबर : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री मलायका अरोरानंतर आता तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता अर्जुन कपूरनेही (Arjun Kapoor) कोरोनाव्हायरसवर (Coronavirus) मात केली आहे. तब्बल एक महिन्यांनंतर अर्जुनने कोरोनाशी झुंज दिली आणि अखेर त्याने हा लढा जिंकला आहे. आपली कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आल्याची बातमी अर्जुनने स्वतः आपल्या सोशल मीडियावर दिली आहे. कोरोनाशी लढल्यानंतर आपल्या आलेल्या अनुभवातून त्याने चाहत्यांनाही कळकळीची विनंती केली आहे.

कोरोनामुक्त होताच अर्जुन कपूरने इस्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट केली. अर्जुन म्हणाला, "माझी कोरोनाव्हायरस टेस्ट नेगेटिव्ह आली आहे, हे सांगताना मला खूप आनंद होतो आहे. आता पूर्णपणे बरा झालो आहे, मला खूप चांगलं वाटतं आहे. आता कामावर पुन्हा परतण्याची उत्सुकता आहे"

View this post on Instagram

🙏

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

"तुम्ही केलेल्या प्रार्थनेसाठी आणि दिलेल्या सकारात्मक ऊर्जेसाठी तुमचे आभार मानतो. हा व्हायरस खूप गंभीर आहे, त्यामुळे याला गांभीर्याने घ्या, असं आवाहन तुम्हाला मी करतो. कोरोनाव्हायरसचा प्रभाव मोठ्यापासून लहानांपर्यंत सर्वांवर होतो. त्यामुळे कृपया नेहमी मास्क वापरा" असं आवाहन त्याने आपल्या चाहत्यांना केलं आहे.

अर्जुनने या पोस्टमध्ये बीएमसी आणि आपला जीव धोक्यात घालून देखभाल करणाऱ्या कार्यकर्त्यांचेही आभार मानले आहेत. "बीएमसी तुम्ही दिलेल्या मदतीसाठी धन्यवाद. आणि आपला जीव धोक्यात टाकून माझी देखभाल करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना सलाम. मी नेहमी तुमचा ऋणी असेन", असं अर्जुन म्हणाला.

हे वाचा - आता भलत्याच कारणामुळे मिलिंद सोमण झाला ट्रोल, पत्नीने ट्रोलर्सला खडसावलं

अर्जुन कपूरला 6 सप्टेंबरला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणं नव्हती. त्यामुळे तो होम क्वारंटाइन झाला होता. त्याने घरीच उपचार घेतले.  त्याने आपल्याला कोरोना झाल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करून दिली होती. एक महिना उपचार घेतल्यानंतर त्याची टेस्ट आता नेगेटिव्ह आली आहे. हेदेखील त्याने सोशल मीडियावर सांगितलं.

हे वाचा - सपना चौधरीने जानेवारीमध्येच लपूनछपून उरकलं लग्न, ऑक्टोबरमध्ये दिली गोड बातमी

अर्जुननंतर मलायका अरोरालाही कोरोना झाला होता. तिच्यामध्येही कोरोनाची लक्षणं नव्हती. तिनेदेखील घरीच उपचार घेतले. कोरोना झाल्यानंतर 15 दिवसांनंतर 20 सप्टेंबरला तिने कोरोनावर मात केली. काही दिवसांपूर्वीच ती घराबाहेरही पडली होती.

First published:

Tags: Arjun kapoor, Bollywood, Coronavirus, Malaika arora