कोरोना, CQV आणि आता Congo fever चा धोका; अशी लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नका

कोरोना, CQV आणि आता Congo fever चा धोका; अशी लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नका

देशातील कोरोनाव्हायरसची (coronavirus) सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात आहेत आणि आता Congo fever बाबतही अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • Share this:

पालघर, 29 सप्टेंबर : भारतात आधीच कोरोनाव्हायरस (coronavirus) थैमान घालतो आहे.त्यात आता इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) देशात CQV हा आणखी एक व्हायरस पसरण्याबाबत चिंता व्यक्त केली आहेत. हे कमी की काय त्यात आता Congo fever चा धोका आहे. गुजरातमध्ये या आजाराचे काही रुग्ण दिसून आल्यानंतर महाराष्ट्रातही हा आजार पसरण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

Crimean Congo Hemorrhagic Fever (CCHF) ज्याला काँगो फिव्हर म्हटलं जातं. या आजाराचे काही रुग्ण गुजरातमध्ये (Gujrat) सापडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील पालघर (Palghar) जिल्हा प्रशासनाने याबाबत अलर्ट जारी केला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार पालघर पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रशांत कांबळे यांनी याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. गुजरातच्या काही जिल्ह्यांमध्ये CCHF आजाराचे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे गुजरातच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात हा आजार पसरू शकतो. त्यामुळे प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

हे वाचा - अरे देवा! कोरोनानंतर आता भारतावर आणखी एका चीनी व्हायरसचं संकट; ICMR ने केलं सावध

प्राण्यांच्या शरीरावरील कीटकांमार्फत प्राण्यांमध्ये हा आजार पसरतो आणि अशा प्राण्यांच्या रक्ताशी संपर्ता आल्यास किंवा अशा प्राण्यांचं मांस खाल्ल्यास माणसांमध्ये हा आजार पसरू शकतो. CCHF वर प्रभावी आणि विशेष असे उपचार नाहीत त्यामुळे आवश्यक ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर याचं वेळीच निदान आणि उपचार झाले नाही तर 30 टक्के रुग्णांचा मृत्यू होता.

हे वाचा - लवकरच होणार कोरोनासारख्या कित्येक आजारांचा खात्मा; VIRUS खाणारा जीव अखेर सापडला

त्यामुळे प्राण्यांच्या संपर्कात येणाऱ्यांनी सावध राहावं. डोकेदुखी, सांधेदुखी, ओटीपोटात वेदना, ताप, मळमळ, डोळे लाल होणे, नाकातून रक्त येणं अशी काही लक्षणं दिसल्यास त्वरित जिल्हा प्रशासनाला कळवा, असं आवाहन या परिपत्रकात करण्यात आलं आहे.

Published by: Priya Lad
First published: September 29, 2020, 4:36 PM IST

ताज्या बातम्या