फक्त लग्नाचे फेरे घेतले आणि गुजरातमध्येच क्वारंटाइन झाली महाराष्ट्राची नवविवाहित सून

फक्त लग्नाचे फेरे घेतले आणि गुजरातमध्येच क्वारंटाइन झाली महाराष्ट्राची नवविवाहित सून

लग्न झाल्यानंतर गुजरातहून (gujrat) महाराष्ट्रात (maharashtra) सासरी येण्याऐवजी नवरीला (newly married bride) थेट क्वारंटाइन व्हावं लागलं.

  • Share this:

वलसाड, 27 नोव्हेंबर : आज तिचं लग्न. तिच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस. माहेर सोडून आज ती सासरी जाणार होती. पतीसोबत नवा संसार थाटणार होती. सासरही तसं काही जवळ नाही. म्हणजे अगदी एक राज्य सोडून ती दुसऱ्या राज्यात जाणार होती. गुजरात हे तिचं माहेर तर महाराष्ट्र हे तिचं सासर. त्यामुळे माहेरच्यांपासून दुरावण्याचं दु:ख तिच्या मनात होतंच, वेदनाही होत होत्या. पण एका नव्या आयुष्याला ती सुरुवात करणार होती. सासर दूर असलं तरी तिथं जाण्यासाठी ती उत्सुक होती. कारण तिथं तिचं नवं कुटुंब तयार होणार होतं. सासरची नवी नाती जुळणार होती. तिथं आपली नवी माणसं तिला भेटणार होती. लग्नाचे विधी करताना, सात फेरे घेताना तिच्या मनात सासरची स्वप्नं रंगत होती. लग्न तर पार पडलं पण तिच्या लग्नाची वरात गुजरातहून सासरी महाराष्ट्राला काही जाऊ शकली नाही. लग्न लागलं आणि त्यानंतर महाराष्ट्राची नवविवाहित सून गुजरातमध्येच क्वारंटाईन झाली.

तिचा आयुष्याचा सोबती तिला नेण्यासाठी महाराष्ट्राहून वरात घेऊन गुजरातमध्ये आला. गुजरातच्या वलसाडमध्ये लग्नसोहळा पार पडला. लग्न झाल्यानंतर नवरीची पाठवणी गुजरातहून महाराष्ट्राला होणार होती. पण तसं झालं नाही. नववधूवर गुजरातमध्येच राहण्याची वेळ आली. तिला तिथंच क्वारंटाइन व्हावं लागलं.

तिचं लग्न जिथं झालं त्या लग्नाच्या हॉलमध्ये कोरोनाची रॅपिड टेस्ट करण्यात आली. वर, वराचं कुटुंबं, वऱ्हाडी आणि वधूकडील पाहुणे सर्वांची टेस्ट नेगेटिव्ह आली. पण वधूची टेस्ट मात्र पॉझिटिव्ह. यानंतर आरोग्य विभागानं वधूला क्वारंटाइन केलं, तिच्यासह तिच्या वडिलांना म्हणजेच वधूपित्यालाही क्वारंटाइन केलं.

हे वाचा - Relationship Funda : घरात असलो की बायको सतत भांडत असते, कधी कधी वाटतं....

कोरोनाचा प्रसार अधिक होऊ नये म्हणून मोजक्याच लोकांच्या उपस्थित लग्नसमारंभाला परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात 50 लोकांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तरी कित्येक लग्नसमारंभामध्ये कोरोनाची प्रकरणं आढळल्याचं दिसून आलं. कुठे वधूला, कुठे वराला, त्यांच्या कुटुंबाला तर काही ठिकाणी तर पूर्ण वऱ्हाडीलाच कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे लग्न समारंभाबाबत प्रशासन अधिक सतर्क आहे. त्याठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेतली जाते आहे. सर्वांच्या टेस्ट केल्या जात आहेत आणि सर्वांना मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग याचं पालन करणंही बंधनकारक करण्यात आलं आहे.

Published by: Priya Lad
First published: November 27, 2020, 9:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading