लंडन, 09 डिसेंबर : आपल्याला कोरोना लस (corona vaccine) कधी मिळणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. यूकेमध्ये (UK) कोरोना लशीकरणाला (corona vaccination) सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना लशीचा आपात्कालीन वापर सुरू झाला आहे. फायझरची (pfizer) कोरोना लस (covid 19 vaccine) सर्वांना दिली जाते आहे. मात्र लस घेताच 24 तासांच्या आतच दोन लोक आजारी पडले आहेत. त्यांना गंभीर संसर्ग झाला आहे. यानंतर आरोग्य विभागानंही अलर्ट जारी केला आहे.
यूएसमधील फायझरच्या कोरोना लशीला ब्रिटनमध्ये (britain) आपात्कालीन मंजुरी देण्यात आली आहे. 8 डिसेंबरपासून लशीकरण सुरू झालं आहे. ब्रिटनमध्ये आरोग्य कर्मचारी आणि वयस्कर व्यक्तींना सर्वात आधी लस दिली जाते आहे. लस घेताच दोघांवर या लशीचा दुष्परिणाम दिसून आला आहे. लशीकरणानतर त्यांना अॅलर्जी झाली आहे. हे दोघंही आरोग्य कर्मचारी आहेत. दोघांनाही Anaphylactoid Reactions झाल्याचं वृत्त डेली मेलनं दिलं आहे. ज्यामध्ये रॅश, श्वास घ्यायला त्रास, चेहरा आणि जिभेला सूज, रक्तदाब कमी होणं अशी लक्षणं दिसून आली आहे.
हे वाचा - कोरोनाची लस इतक्यात नाहीच; केंद्रानं जाहीर केला मोठा निर्णय
ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनंदेखील (NHS) हे मान्य केलं आहे. एनएचएसचे नॅशनल मेडिकल डायरेक्टर प्राध्यापक स्टिफन पोव्हिस यांनी सांगितलं, लस घेतल्यानंतर ज्या दोन व्यक्तींना अॅलर्जी झाली ते आता बरे होते आहेत. त्यांना आधीपासूनच अॅलर्जी होती.
दरम्यान लशीकरणानंतर असा परिणाम दिसताच ब्रिटनच्या मेडिसीन अँड हेल्थकेअर प्रोडक्ट रेग्युलेटरी एजन्सीनं (MHRA) अलर्ट जारी केला आहे. ज्यांना औषध, लस किंवा एखाद्या पदार्थाची अॅलर्जी आहे, त्यांना फायझरची लस देऊ नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
हे वाचा - पहिला Coronavirus सापडला तो वुहानचा बाजार आता कसा फुललाय पाहा PHOTO
यूएसमधील फायझर आणि जपानमधील बायोटेएनटेकनं ही लस विकसित केली आहे. ही लस 95% प्रभावी असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या अहवालावरून लशीची सुरक्षितता सांगण्यात आली. हा अहवाल जारी होताच फक्त 23 दिवसांच यूकेनं आपात्कालीन वापराला परवानगी दिली आहे. ब्रिटनच्या मेडिसीन अँड हेल्थकेअर प्रोडक्ट रेग्युलेटरी एजन्सीनं (MHRA) या लशीला मंजुरी दिली आहे. कोरोना लशीला आपात्कालीन मंजुरी देणारा यूके पहिला देश ठरला आहे. फायझरनं भारतातही या लशीच्या वापरासाठी परवानगी मागितली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) यासाठी अर्ज केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine