Home /News /lifestyle /

फ्लाइट कॅन्सल होताच महिलेने केला असा टाइमपास; मिळाले तब्बल 7 कोटी

फ्लाइट कॅन्सल होताच महिलेने केला असा टाइमपास; मिळाले तब्बल 7 कोटी

फ्लाइट कॅन्सल झाली आणि महिलेला लागला जॅकपॉट.

     जेफरसन सिटी, 05 ऑगस्ट : तुम्ही विमानाने (Plane) प्रवासाला निघालात आणि तुमचं फ्लाइट कॅन्सल (Flight cancelled) झालं तर तुम्ही काय कराल? गाणी ऐकत बसाल, मोबाईलवर एखादी फिल्म पाहाल, एखादं पुस्तक घेऊन वाचाल. पण एका महिलेनं विमान रद्द (Plane cancelled) झाल्यानंतर असं काम केल्यानंतर टाइमपास म्हणून असं काम केलं, ज्यामुळे ती कोट्यवधीचं बक्षीस जिंकली आहे (Woman won crore rupees after flight cancelled). विमान रद्द झाल्यानंतर मिसौरीतील (Missouri) एका महिलेचं नशीब फळफळलं आहे. एंजेला कॅरावेला असं या महिलेचं नाव आहे. 51 वर्षांची एंजेला विमान प्रवासाला गेली होती. पण अचानक तिचं फ्लाइट कॅन्सल झालं. आता वेळ कसा घालवायचा हा विचार तिने केला. त्यानंतर तिने टाइमपास म्हणून एक लॉटरीचं तिकिट खरेदी केलं आणि मग काय तिचं नशीबच बदललं. हे वाचा - हे काय? LIVE REPORTINGवेळी मागे वळून पाहताच घाबरला पत्रकार; कॅमेऱ्यासमोरून पळाला एंजेलाने टाइमपास म्हणून जे लॉटरी तिकिट खरेदी केलं, ते ती जिंकली. तिने तिला 10 लाख डॉलर्स म्हणजे तब्बल 7 कोटींपेक्षा जास्त रुपयांचं बक्षीस जिंकलं. हे समजातच तीसुद्धा हैराण झाली. एंजेलाने सांगितलं की अचानक विमानचं उड्डाण रद्द झालं. काहीतरी विचित्र होणार आहे असं मला वाटलं. टाइमपास करण्यासाठी म्हणून मी काही तिकिटं खरेदी केली आणि 10 लाख डॉलर्स जिंकले. फ्लोरीडा लॉटरीने दिलेल्या माहितीनुसार कनसास सिटीतील या महिलेने द फास्टेस्ट रोड टू यूएसी 10,00,000 स्क्रॅच गेम खेळली. ज्यामध्ये तिने गेल्या महिन्यात 10 लाख डॉलर्सचं बक्षीस जिंकलं आहे. हे वाचा - बार्बी डॉलसारखं दिसण्याच्या वेडापायी महिलेने केला 50 लाखांहून अधिक खर्च रिपोर्टनुसार  तांपातील ब्रॅडनमधील पब्लिक्स सुपरमार्केटमधून तिनं हे तिकीट खरेदी केलं होतं. या स्टोअरला 2,000 डॉलर बोनस म्हणून दिले जाणार आहेत.  यूएसडी 30 खेळ जो कॅरावेलाने जिंकला आहे, तो फेब्रुवारी 2020 मध्ये सुरू झाला होता. ज्यामध्ये 10 लाख डॉलर्सची 155 बक्षीसं आणि 94.8 कोटी डॉलर्सचे रकमी पुरस्कार आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Airplane, Lifestyle, Lottery, Travel by flight

    पुढील बातम्या