मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अरे देवा! कोरोनानंतर आता अज्ञात आजाराचं संकट; झपाट्यानं वाढत आहेत रुग्ण

अरे देवा! कोरोनानंतर आता अज्ञात आजाराचं संकट; झपाट्यानं वाढत आहेत रुग्ण

कोरोना लस (corona vaccine) लवकरच उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे लवकरच आपण या आजाराविरोधातील लढा जिंकू अशी आशा असताना आता आणखी एका नव्या आजाराचं (mystery disease) संकट येऊन ठेपलं आहे.

  • Published by:  Priya Lad
हैदराबाद, 07 डिसेंबर : जगभरात सध्या कोरोनाचं (coronavirus) थैमान सुरू आहे. भारतही या महाभयंकर आजाराशी झुंज देत आहे. पण आता कोरोना लस लवकरच उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे लवकरच आपण या आजाराविरोधातील लढा जिंकू अशी आशा असताना आता आणखी एका नव्या आजाराचं (mystery disease) संकट येऊन ठेपलं आहे. भारतात आणखी एका अज्ञात आजाराचं संकट ओढावलं आहे. आंध्र प्रदेशच्या (andhra pradesh) एलुरूमध्ये (Eluru) एका अज्ञात आजारानं थैमान घातलं आहे. या अज्ञात आजाराच्या विळख्यात शेकडो लोक सापडले आहे. या आजाराच्या रुग्णांची संख्या अचानाक वाढू लागली आहे. रविवारी रात्रीपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. एकाच रात्रीत आणखी 76 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता एकूण रुग्णांची संख्या 350 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 186 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 164 रुग्णांवर अजून  उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे. हे वाचा - Pfizer नंतर कोव्हिशील्ड लस आपत्कालीनं वापरासाठी सीरमने मागितली परवानगी हा आजार नेमका कशामुळे, कुठून आणि कसा होतो आहे, याचं कारण नेमकं माहिती नाही. रुग्णांमध्ये फिट्स, मळमळ अशी लक्षणं दिसून येतात आणि रुग्ण अचानकपणे बेशुद्ध होत आहेत. सोशल मीडियावर या आजाराची चर्चा आहे. काही जणांच्या मते, हा प्रदूषित पाण्यामुळे झालेला आजार आहे, तर काही जणांना वाटतं हा व्हायरसमुळे झालेला आजार आहे. तरी खबरदारी म्हणून सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी देण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार मंगलगिरी एम्सचे डॉक्टर, हैदराबादच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ न्यूट्रिशनच्या तज्ज्ञांची टीमला एलुरूमद्ये पाठवण्यात आलं आहे. तिथल्या पाण्याचे नमुने केले जातील आणि मृत्यूचं कारण शोधतील.  मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनीदेखील या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आहे. हे वाचा - बॉलिवूडला एकाच दिवशी मोठा धक्का; 2 कलाकारांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह भारतात एकूण 9677203 कोरोना रुग्णांची नोंद आहे. सध्या 396729 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 9139901 रुग्ण बरे झाले आहेत तर 140573 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असताना आता भारतासमोर हे आणखी एक नवं संकट ओढावलं आहे.
First published:

Tags: Coronavirus, Serious diseases

पुढील बातम्या