मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोरोनाव्हायरसपेक्षाही भयंकर chapare virus; वेळीच ओळखा लक्षणं

कोरोनाव्हायरसपेक्षाही भयंकर chapare virus; वेळीच ओळखा लक्षणं

चॅप्रे व्हायरसची (chapare virus) लागण झाल्यास साध्या तापासारखाच ताप येतो.

चॅप्रे व्हायरसची (chapare virus) लागण झाल्यास साध्या तापासारखाच ताप येतो.

चॅप्रे व्हायरसची (chapare virus) लागण झाल्यास साध्या तापासारखाच ताप येतो.

  • Published by:  Priya Lad
वॉशिंग्टन, 19 नोव्हेंबर :  एकिकडे कोरोनाव्हायरस (coronavirus) जगभर धुमाकूळ घालतो आहे, अशात कोरोनाव्हायरसपेक्षाही भयंकर असा व्हायरस आला आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज अँड प्रिव्हेन्शला चॅप्रे व्हायरस (chapare virus) हा एबोलासारखा व्हायरस सापडला आहे. बोलिव्हियामध्ये या व्हायरसचा संसर्ग होण्याच्या घटना समोर आल्या आहे. बोलिव्हियातील ग्रामीण भागात उद्भवलेल्या या आजाराने मोठा फटका बसणार नसल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. चॅप्रे हा Arenaviridae या विषाणूंच्या फॅमिलीतला असून इबोला विषाणू देखील त्याच्याच फॅमिलीतला आहे. संशोधकांनी सांगितले की, हा विषाणू बर्‍याच वर्षांपासून पसरत आहे. मात्र बोलिव्हियामध्ये याचा शोध लागला आहे. बोलिव्हियातील चॅप्रे भागात हा विषाणू 2004 मध्ये आढळला होता. त्यावरून या विषाणूला चॅप्रे असं नाव ठेवण्यात आलं. मागील वर्षी बोलिव्हियात पाच जणांना या विषाणूची बाधा झाली होती. बोलिव्हियाची राजधानी ला पाझमध्ये रुग्ण सापडले होते. त्यातील तीनजण हे आरोग्य कर्मचारी होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला होता. हे वाचा - सलग दुसऱ्या दिवशी COVID-19 रुग्णांमध्ये वाढ, मृत्यूची संख्याही 154 वर प्रामुख्याने हा व्हायरस आणि उंदीर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या माध्यमातून पसरतो. थेट त्यांच्या संपर्कात आल्याने आणि त्यांच्या मलमूत्रामार्फत देखील हा विषाणू संक्रमित होऊ शकतो. त्याचबरोबर बाधित व्यक्तच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तिंनाही या विषाणूची बाधा होण्याची शक्यता आहे. हवेतून हा व्हायरस पसरण्याची शक्यता नसून थेट संपर्कात आल्यानंच हा व्हायरस पसरू शकतो. आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना याचा सर्वात जास्त धोका असून उपचार करताना त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. हे वाचा - मोठी बातमी! भारतात पहिल्यांदाच मंत्री घेणार CORONA VACCINE चॅप्रे विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तींना ताप येणं, पोटात दुखणं, उलट्या, हिरड्यांमधून रक्त येणं, त्वचेवर व्रण उठणं, डोळे चुरचुरणंही लक्षणं आढळून येतात. यामुळे ब्रेन हॅमरेज होण्याची शक्यता असते.  या आजारावर अद्यापही ठोस औषध, उपचार सापडले नसून करोनाप्रमाणेच या आजारावरही उपलब्ध असलेल्या औषधांद्वारे उपचार करण्यात येतात. हायड्रेशन, वेदना कमी करणं, वेदनाशामक औषधांच्या मदतीने सध्या या आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
First published:

Tags: Coronavirus, Disease symptoms, Health, Serious diseases, Virus

पुढील बातम्या