Home /News /lifestyle /

अरे देवा! कोरोनाचं संकट त्यात आता उलटला 200 वर्षे जुना आजार; दोघांचा घेतला जीव

अरे देवा! कोरोनाचं संकट त्यात आता उलटला 200 वर्षे जुना आजार; दोघांचा घेतला जीव

उंदरांमार्फत (mice) हा आजार पसरतो, त्यामुळे नागरिकांनी उंदरांचा धसका घेतला आहे.

    इंदोर, 12 नोव्हेंबर : जगभरात कोरोनाव्हायरसचा कहर आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. हे संकट कमी की काय त्यात आणखी एका आजाराचं संकट आलं आहे. 200 वर्षे जुन्या आजारानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. 200 वर्षांनी हा आजार उलटला आहे. मध्य प्रदेशमध्ये या आजाराचे रुग्ण दिसून आले आहेत, तर काही जणांचा बळीही गेला आहे. मध्य प्रदेशच्या पन्नामध्ये स्क्रब टायफस (scrub typhus) पुन्हा हातपाय पसरू लागला आहे. आतापर्यंत या आजाराचे चार रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे, असं वृत्त आज तकनं दिलं आहे. स्क्रब टायफस हा आजार उंदरांमार्फत पसरतो.  डोकेदुखी, ताप, स्नायूंमध्ये वेदना, धाप लागणं, खोकला, अस्वस्थ वाटणं, उलटी अशी या आजाराची लक्षणं आहेत. काही रुग्णांच्या शरीरावर डागही होतात. हे वाचा - सावधान! कोरोनाची दुसरी लाट येणार, औषध प्रशासन मंत्र्यांनी दिले संकेत स्क्रब टायफस जिल्हा प्रभारी डॉ. गुंजन सिंग यांनी दिलेल्या माहितीनसार, हा आजार 200 वर्षे जुना आहे आणि आता पन्नामध्ये दिसून आला आहे. पन्नामध्ये आतापर्यंत चार प्रकरणं आढळली आहेत. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. सीएमएचओ पन्ना डॉ. एल.के. तिवारी यांनी सांगितलं, राज्यातील पन्ना, सतना, दमोह, डिंडोरी आणि मंडला अशा दहा ते अकरा जिल्ह्यांमध्ये अशी प्रकरणं दिसून आली आहेत. स्क्रब टायफस हा उंदरातील जीवाणूमार्फत पसरतो, ज्याला ओरियंटा सुसु गेमॉसी असं म्हटलं जातं. हे वाचा - कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांनी ओलांडला 16 लाखांचा टप्पा, गर्दी वाढल्याने चिंता मध्य प्रदेश राज्यातील स्क्रब टायफस प्रभारी यांनी सांगितलं, पन्नामध्ये या आजारामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर त्या ठिकाणचे उंदीर आणि स्थानिक लोकांचे नमुने घेण्यात आले आहेत. जेणेकरून हा आजार कुठून पसरला आहे, ते समजेल.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Madhya pradesh, Serious diseases

    पुढील बातम्या