'मेरा तो लाइफ इतना खराब हो गया'; PUBG बंदीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

'मेरा तो लाइफ इतना खराब हो गया'; PUBG बंदीनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

पबजीच्या जाण्याने अनेकांना मोठं दु:ख झालं आहे, नेटकऱ्यांनी मात्र त्याची चांगलीच मजा घेतली आहे

  • Share this:

मुंबई, 2 सप्टेंबर : गलवान खोऱ्यात झालेल्या तणावानंतर भारताने चीनविरोधात कडक पाऊल उचललं होतं. यापूर्वी केंद्र सरकारने चीनच्या टिकटॉकसह हॅलो यासारख्या प्रसिद्ध अपवर बंदी आणली होती. काही दिवसांपूर्वी पुन्हा चीनने भारताच्या सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आज केंद्र सरकारने चीनच्या पबजीसह 118 अप्सवर बंदी आणली आहे.

पबजी या खेळाची मुलांमध्ये मोठी क्रेझ आहे. आता पबजीवर बंदी आणल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ झाला आहे. अनेकांनी पबजी बंद झाल्याने दु:ख व्यक्त केले आहे. मात्र सरकारच्या या निर्णयामुळे मुलाच्या पबजी खेळामुळे त्रस्त झालेल्या पालकांना मोठा दिलासा दिला आहे.

सध्या पबजी सोशल मीडियावर ट्रेंड करीत आहेत. नेटकऱ्यांनी पबजी बंदीवर केलेले मीम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. पबजी कायमच मुलांमधील आवडता गेम राहिला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: September 2, 2020, 7:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading