6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude Photoshoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं

6 मॉडेल्सनी बोटीवर केलं Nude Photoshoot; ऐन रमझानमध्ये तुर्कस्तानात वातावरण तापलं

तुर्कस्तानात कडक लॉकडाउन आहे. (coronavirus lockdown turkey). त्यात ऐन रमजानच्या काळात परदेशी (Ukraine) मॉडेल्सनी हे गैरवर्तन केल्याने देशभर संतापाचा लाट उसळली आहे.

  • Share this:

अंकारा (तुर्कस्तान), 13 मे : काही दिवसांपूर्वीच दुबई (Dubai)मध्ये मॉडेलच्या ‘Butt squad’ न्यूड फोटशूट (Nude Photoshoot) मुळे गोंधळ उडाला होता. या फोटोशूटमध्ये सहभागी झालेल्या 12 मॉडेलमुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता. दुबईतल्या या घटेनेची पुनर्वृत्ती आता तुर्कस्तानात (Turkey) झालेली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यातच ही घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. परदेशातल्या मॉडेल्सच्या या गैरवर्तनामुळे देशभरात वातावरण तापलं आहे.

सध्या मुस्लीमांचा पवित्र रमझान (Ramadan) महिना सुरू आहे. या संपूर्ण महिन्यात मुस्लीम समाजातील लोकांचे उपवास सुरू असतात. याच काळात तुर्कस्तानमध्ये युक्रेनच्या (Ukraine) 6 मॉडेल्सनी एका लक्झरी बोटीमध्ये न्यूड फोटोशूट (Nude Photoshoot on boat in Turkey) केलं आहे. त्यांच्यासोबत 2 पुरुषही होते. पाण्याबरोबर खेळत बोटीने प्रवास करत या मॉडेल्सनी एकमेकींचे फोटो काढले आहेत.

स्थानिक वृत्तसंस्थांनुसार रमझानच्या पवित्र महिन्यात करण्यात आलेल्या या फोटो शूटमुळे भयंकर संताप आहे. कोरोना काळात टर्कीमध्ये पूर्ण लॉकडाऊन (Complete Lockdown in Turkey) आहे. तरी देखील या मॉडेल्सनी तिथल्या गोसेक समुद्रात (Gocek bay)  लक्झरी बोटीने (Luxury Boat) प्रवास केला. याच दरम्यान त्यांनी हे फोटो काढले. सध्या पूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे लोक घराबाहेर पडत नाहीत पण, विदेशी पर्यटक अशा प्रकारे बाहेर फिरुन कोरोनाने त्यांना काही फरक पडत नसल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत अशी चर्चा आहे.

SEX साठी E-pass हवाय; तरुणाची विचित्र मागणी पाहून पोलीसही चक्रावले आणि...

मॉडेल ऍनास्तेशीयाने (Model Anustesia) या प्रकरणावर भाष्य करताना तिला देखील या फोटोशूटमध्ये सहभागी होण्याची ऑफर मिळाली होती आणि ती नाकारली असल्याचं सांगितलेलं आहे. हीच ऍनास्तेशीया दुबई मधील फोटोशूटमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे या सहा मॉडेल दुबईच्या फोटोशूटची पुनरावृत्ती करुन मुद्दाम खोडसाळपणाने बातम्यांच्या हेडलाइन्समध्ये यायचा प्रयत्न करत असल्याचं तिचं मत आहे. व्हेरानिका कुर्गाना, डायना पोग्रीलया आणि स्नजहान्न या युक्रेनियन मॉडेल या फोटोशूटमध्ये दिसत आहेत.

लक्झरी बोटमधील या न्युड फोटशूटचा एक व्हीडिओही व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हीडिओमध्ये 6 मॉडेल आणि 2 तरुणही दिसत आहेत. या बोटमध्ये तर, 4 मॉडेल टॉपलेस होत्या, तर, 2 जणींनी न्युड फोटो काढले. या कॉन्ट्रवर्सीमध्ये 21 वर्षांचा मॉडेल रुसाना याचं नाव आल्यानंतर त्याने आपल्या अकाऊंटवरुव फोटो डीलिट केलेत.

अरे बापरे! टपटप... टपटप... पाणी नाही तर जमिनीवर चक्क कोसळला उंदरांचा पाऊस

तर, या संदर्भात मॉडेल ज्युलीया वेंत्रावावाने एक व्हीडिओ मेसेज शेअर केला आहे. “माणूस आपल्या चुकांमधूनच शिकतो. खरंतर, दुबईच्या घटनेनंतर मुस्लीम देशांमध्ये न्युड फोटोशूट किती धोखादायक आहे हे आता लक्षात आलं आहे. त्यामुळे जेव्हा मुस्लीम देशांमध्ये न्युड फोटोशूट करणार असाल तर, एकतर सुरक्षेची काळजी घ्या किंवा आपलं लोकशन हाईड करा“ असं त्याने म्हटलंय.

Published by: News18 Desk
First published: May 13, 2021, 11:40 PM IST
Tags:

ताज्या बातम्या