मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

स्टेजवर जाऊन बोलण्यासाठी वाटते भीती? जाणून घ्या 'या' खास टिप्स

स्टेजवर जाऊन बोलण्यासाठी वाटते भीती? जाणून घ्या 'या' खास टिप्स

 तुम्हालाही अशी भीती असेल, तर या काही टिप्स नक्की उपयोगी पडतील. स्टेज फिअर (Stage Fear) घालवण्यासाठी काय करता येईल?

तुम्हालाही अशी भीती असेल, तर या काही टिप्स नक्की उपयोगी पडतील. स्टेज फिअर (Stage Fear) घालवण्यासाठी काय करता येईल?

तुम्हालाही अशी भीती असेल, तर या काही टिप्स नक्की उपयोगी पडतील. स्टेज फिअर (Stage Fear) घालवण्यासाठी काय करता येईल?

मुंबई, 31 मे : बोलणं ही समोरच्यावर प्रभाव पाडणारी कला आहे. तुमच्या बोलण्यावरून समोरचा तुमच्याबद्दलचं मत तयार करतो. करिअर म्हणून नाही, तर व्यवहारात सगळ्याच ठिकाणी संवाद कौशल्य आवश्यक असतं. कधी स्टेजवर जाऊन, तर कधी चारचौघांमध्ये बसून बोलण्याची गरज पडते. त्यावेळी तुमच्यात स्टेज डेअरिंग (Stage Daring) म्हणजे सभाधीटपणा किती आहे, हे लक्षात येतं. एखादा मुद्दा व्यवस्थितपणे तुम्ही मांडू शकता की नाही, श्रोत्यांवर तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडतो की नाही, हे सगळं तुम्ही किती व्यवस्थित बोलता, यावरच अवलंबून असतं. अर्थात हे प्रत्येकाला जमतंच असं नाही. तुम्हालाही अशी भीती असेल, तर या काही टिप्स नक्की उपयोगी पडतील. स्टेज फिअर (Stage Fear) घालवण्यासाठी काय करता येईल?

स्टेज डेअरिंग सगळ्यांना जमत नाही. बोलण्याचं कौशल्य असलेले लोकच आपला विचार दुसऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहचवू शकतात. इतरांना मात्र कायमच इतकं छान कसं बोलावं, असा प्रश्न पडतो. अनेकदा संभाषण कौशल्य नसल्यामुळे मनातील गोष्टीही समोरच्याला सांगण्याची अडचण होते. हे टाळण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरता येतात, याबाबत 'आज तक'नं सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

स्टेजवर जाऊन बोलताना काही वेळा भाषण (Speech) विसरण्याची शक्यता असते. श्रोत्यांना ही गोष्ट जाणवू द्यायची नसेल, तर स्वतःसोबत स्टेजवर जाताना पाण्याची एक बाटली (Water Bottle) ठेवा. एखादी एखादा मुद्दा तुम्ही विसरताय असं जाणवलं, तर पाणी प्या. त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट आठवायला वेळ मिळेल व समोरच्याला कळणारही नाही. अशा पद्धतीनं तुमची विरसण्याबाबतची भीती कमी होईल.

स्टेजवर जाऊन बोलण्याआधी त्या विषयाचा सखोल अभ्यास (Thorough Study) करणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे विषयाबाबतची संदिग्धता मनातून जाते. मुद्द्यांची योग्य मांडणी करून वेळेचा अंदाज ठरवणंही उपयोगी पडतं. एका कागदावर मुद्दे लिहून घेतले, तर त्या अनुषंगाने बोलणं सोपं जातं. भाषण देण्याची भीती वाटत असेल, तर घरीच त्याची प्रॅक्टिस करणं चांगलं. त्यामुळे आपल्या कुठे चुका होतात, याची कल्पना येते आणि आयत्यावेळी होणाऱ्या चुका टाळता येऊ शकतात.

श्रोत्यांशी संवाद साधताना आपल्याला वाटणाऱ्या भीतीबद्दल लोकांना सांगितलं, तर लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तुमच्याकडे श्रोते सहानुभुतीनं पाहतात. त्यामुळे तुमच्या मनावरचं दडपण कमी होतं.त्यामुळे तुम्ही खूपच घाबरलेले असाल तर सुरुवातीला श्रोत्यांना सांगून टाका की मी नव्यानेच बोलतो आहे चुकलं तर सांभाळून घ्या.

जग स्पर्धात्मक आहे. प्रत्येक बाबतीत स्वतःला सिद्ध करण्याची गरज असते. त्यासाठी व्यक्तिमत्त्वात योग्य बदलही करावे लागतात. काही जणांना स्टेजवर जाऊन बोलण्याची भीती वाटते. पाच लोकांसमोर जरी बोलायचं म्हटलं, तरी अनेकांना दडपण येतं. त्याचं कारण मनात असलेली भीती; पण वक्तृत्व ही कला अशी असते, की त्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास वाढतो. व्यक्तिमत्त्व विकासातील हा सगळ्यात मोठा भाग आहे. त्यामुळे यावर लक्ष देण्याची गरज असते. या टिप्स पाळल्या तर तुमचं जाहीर भाषण सुधारत जाईल आणि काही दिवसांनी तुम्ही उत्तम भाषण करू लागाल.

First published: