मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

गृहिणींनो, Russia-Ukraine युद्धाचा परिणाम थेट होणार तुमच्या किचन बजेटवर; वाढणार प्रचंड महागाई

गृहिणींनो, Russia-Ukraine युद्धाचा परिणाम थेट होणार तुमच्या किचन बजेटवर; वाढणार प्रचंड महागाई

कच्च्या तेलाच्याच नाही, तर खाद्यतेलांच्या (Edible Oil) किमतीही वाढल्याने ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे.

कच्च्या तेलाच्याच नाही, तर खाद्यतेलांच्या (Edible Oil) किमतीही वाढल्याने ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे.

कच्च्या तेलाच्याच नाही, तर खाद्यतेलांच्या (Edible Oil) किमतीही वाढल्याने ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे.

मुंबई, 04 मार्च:   रशियाने युक्रेनविरोधात (russia ukraine war) युद्ध पुकारलं आहे. या युद्धाचे संपूर्ण जगभरात पदसाड उमटत आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेवर रशिया-युक्रेन संघर्षाचे परिणाम होत आहेत. कोरोना संकटानंतर आता रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा फटका भारतातील सर्वसामान्य जनतेला बसत आहे. होळीच्या (Holi) सणाला काही दिवसच बाकी आहेत. यंदाच्या होळीला नागरिकांना महागाईचे चटके बसणार आहेत. रशिया-युक्रेन तणावाच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या किमती वाढल्या आहेत. कच्च्या तेलाच्याच नाही, तर खाद्यतेलांच्या (Edible Oil) किमतीही वाढल्याने ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे. याबाबतचे वृत्त टीव्ही 9 हिंदीने दिलं आहे. दिल्लीत गेल्या 15 दिवसांत पामतेलाच्या दरांमध्ये 20 ते 25 रुपयांनी वाढ झाली आहे. सोया, सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाच्या दरांतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मोहरीच्या तेलाचे दरदेखील 200 प्रति किलो रुपयांपर्यंत गेले आहेत. मर्यादित जागतिक पुरवठ्यामुळे तेलाचे दर आधीच आभाळाला टेकलेले आहेत. आता यात युक्रेन-रशिया युद्धाने आणखी भर टाकली आहे. #PGStory: त्या रात्री समजलं सत्य! आम्ही राहत होतो ते घर नव्हतं, होता ‘कोठा’ गेल्या 15 फेब्रुवरीला पामतेलाचा भाव 132 प्रति किलोएवढा होता. त्यात 23 रुपयांनी वाढ होत 155 वर दर पोहचला आहे. तसेच सोया तेल प्रति किलो 157 रुपये दराने मिळत होते. त्यात 10 रुपयांनी वाढ झाली असून आता एक किलो सोया तेलाची किंमत 167 रुपये झाली आहे. सूर्यफूल तेलाचा भाव 15 फेब्रुवरीला 181 होता. त्यात 2 रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच शेगदाणे तेल 194 किलो दराने 15 फेब्रवरीपर्यंत मिळत होते. यात 2 रुपयांनी वाढ झाली आहे. 1 मार्च रोजी शेंगदाणा तेलाची किंमत 196 वर पोहचली आहे. याशिवाय, मोहरीचे तेल 200 रुपये किलो दराने मिळत होते. यात 3 रुपयांनी वाढ झाली असून आता 203 रुपयांना मिळत आहे. देशात वापरल्या जाणार्‍या खाद्यतेलापैकी 65 टक्के तेल आयात करावं लागतं. आयात केलेल्या तेलांपैकी सुमारे 60 टक्के हे पामतेल आहे. सर्व पामतेल मलेशिया आणि इंडोनेशिया येथून आयात केलं जातं. यंदा मर्यादित पुरवठा आहे. मलेशियात डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीमध्ये कच्च्या पामतेलाच्या उत्पादनात सुमारे 14 टक्क्यांनी आणि साठ्यात 8 टक्क्यांनी घट झाली होती. जानेवरी महिन्यात मलेशियामध्ये 12.53 लाख टन उत्पादन झाले होते. हेच उत्पादन डिसेंबरमध्ये 14.5 लाख टन एवढे होते. म्हणजे यात 13.6 टक्क्याची घट झाली. युद्दापूर्वीच तेलाच्या पुरवठ्याचा तुडवडा निर्माण झाला होता. आता युक्रेन-रशिया युद्धामुळे हा तुटवडा आणखी वाढला आहे. देशात आयात होणाऱ्या एकूण खाद्यतेलापैकी सूर्यफूल तेलाचा वाटा 14 ते15 टक्के आहे. हे तेल रशिया आणि युक्रेनमधून बहुतांश प्रमाणात आयात होते. ऑक्टोबर 2020-21 देशात 131.31 लाख टन खाद्यतेल आयात करण्यात आले होते, त्यापैकी सुमारे 19 लाख टन सूर्यफूल तेल होते आणि त्यातील 1.6 दशलक्ष टनांहून अधिक हे युक्रेन आणि रशियामधून आले होते. आता युद्धपरिस्थिती निर्माण झाल्याने पुरवठा खंडित होण्याची शक्यता वाढली आहे. 2020-21 मध्ये सूर्यफूल तेलाची आयात ही 18.93 लाख टन झाली होती. यात 16.70 युक्रेन-रशियाचा वाटा होता. देशातील GST फसवणुकीची सर्वात मोठी घटना, कल्याणमधून भामट्याला बेड्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे स्वयंपाकघराचे बजेटच बिघडत नाही. तर उन्हाळ्यात आईस्क्रीम खाणेही महागात पडू शकते. आईस्क्रीम तयार करायला लागणारे बरेच पदार्थ हे वनस्पती तेलापासून तयार केले जातात. आता तेल महाग झाल्याने आईस्क्रीमही महागणार. तसेच आईस्क्रीमसोबतच पॅक केलेले स्नॅक्स आणि बाहेर खाणे देखील पूर्वीपेक्षा महाग होऊ शकते. यावर उपाय म्हणजे आपल्याला देशातील तेलबियांवर अवलंबून राहावे लागेल. यंदा तेलबियांचे विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. कृषी मंत्रालयाने यावर्षी 371 लाख टन तेलबियांचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पण, चांगले उत्पादन घेऊनही संपूर्ण देशाची गरज पुरेल एवढ्या तेलाचे उत्पादन भारतात होत नाही.
First published:

Tags: Food, Inflation, Lifestyle, Russia Ukraine

पुढील बातम्या