Home /News /lifestyle /

जास्त फळं खाणंही आहे धोकादायक! या अवयवांवर होतो परिणाम

जास्त फळं खाणंही आहे धोकादायक! या अवयवांवर होतो परिणाम

फ्रक्टोज सामान्यतः फळे आणि मधात आढळतात. जर शरीरात फ्रुक्टोजचे प्रमाण वाढलं तर त्याचा शरीराच्या अवयवांवर विपरीत परिणाम होऊ लागतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हे सर्वात जास्त नुकसानकारक ठरू शकते.

    नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : संतुलित आहाराचे मुख्य स्रोत विविध फळे (fruits) मानली जातात. फळांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. तसेच ते फायबरचा (Fiber) उत्तम स्त्रोत आहेत. फळांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यात कर्करोगाशी (Cancer) लढण्याची क्षमता आहे. रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीही फळे फायदेशीर आहेत. फळांमुळे शरीराचे वजन देखील संतुलित राहते. मात्र, हे सर्व असलं तरी जास्त प्रमाणात फळे खाल्ल्यानं फायद्याऐवजी हानी होऊ शकते. इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, फ्रक्टोज सामान्यतः फळे आणि मधात आढळतात. जर शरीरात फ्रुक्टोजचे प्रमाण वाढलं तर त्याचा शरीराच्या अवयवांवर विपरीत परिणाम होऊ लागतो. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हे सर्वात जास्त नुकसानकारक ठरू शकते. यकृत शरीरातील अतिरिक्त फ्रुक्टोज चरबीमध्ये बदलते. ही अतिरिक्त चरबी यकृतात जमा होऊ लागते, ज्यामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग (NAFLD) होऊ शकतो. हा एक सामान्य यकृत रोग आहे, जो जगातील जवळपास 20 टक्के लोकसंख्येला प्रभावित करतो. फ्रुक्टोज हे या रोगाचे मुख्य कारण आहे. फ्रुक्टोजच्या अतिसेवनामुळे यकृताला सूजही येऊ शकते. मेंदू अलीकडील अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की फ्रुक्टोजच्या अत्याधिक वापरामुळे मेंदूच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे न्यूरोइनफ्लेमेशन, ब्रेन माइटोकॉन्ड्रियल डिसफंक्शन आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होऊ शकतो. फ्रुक्टोजचा जास्त प्रमाणात वापर केल्यास मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. हे वाचा - दुधी भोपळ्याचा रस ठरला घातक; ICU मध्ये पोहोचली अभिनेता आयुष्यमन खुरानाची पत्नी हृदय, लठ्ठपणा आणि मधुमेह फ्रुक्टोजच्या अतिसेवनामुळे इन्सुलिन प्रतिरोध होऊ शकतो, लठ्ठपणा वाढतो आणि हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. फ्रुक्टोजचे सतत सेवन केल्याने लेप्टिन हार्मोनचे संतुलन बिघडते, ज्यामुळे शरीरात चरबी जमा होऊ लागते. जास्त फ्रुक्टोजमुळे ग्लुकोजचे प्रमाणही वाढते. यामुळे शरीरात ट्रायग्लिसराइड नावाच्या चरबीची पातळी वाढते, जी यकृतात जमा होते. किती फळे खावीत? फळांमध्ये भरपूर पाणी आणि फायबर आढळतात, त्यामुळे त्याचा जास्त वापर करणे सोपे नाही. भारतासारख्या देशांमध्ये फळे क्वचितच वापरली जातात. सर्वसाधारणपणे, दररोज 400 ग्रॅम फळे खाण्याची शिफारस केली जाते. यापेक्षा जास्त फळांचे सेवन केल्यास नुकसान होऊ शकते. हे वाचा - भीतीदायक प्राण्यांसोबत रात्र घालवण्याची संधी; एका रात्रीसाठी लाखो रुपये खर्च करायला तयार आहेत लोक उच्च फ्रक्टोज फळे फ्रक्टोज सामान्यतः काही फळे, काही भाज्या, फळांचा रस, मध इत्यादींमध्ये आढळणारी नैसर्गिक साखर असते. याशिवाय ऊस, बीट, कॉर्न, सफरचंद, केळी, द्राक्ष, नाशपाती, जर्दाळू यासारख्या अनेक फळांमध्ये फ्रुक्टोज नैसर्गिकरीत्या आढळतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Fruit, Health Tips

    पुढील बातम्या