मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /'सुपरहिरो'प्रमाणे हवेत उडायचं, पाण्यावर चालायचंय? सहज शक्य आहे फक्त बॉर्डर क्रॉस करा आणि पैसे भरा! पाहा थ्रिलिंग VIDEO

'सुपरहिरो'प्रमाणे हवेत उडायचं, पाण्यावर चालायचंय? सहज शक्य आहे फक्त बॉर्डर क्रॉस करा आणि पैसे भरा! पाहा थ्रिलिंग VIDEO

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी असे व्हीडिओ केले जातात.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी असे व्हीडिओ केले जातात.

एखाद्या सिनेमातल्या सुपरहिरोसारखे अशक्यप्राय स्टंट्स तुम्हालाही करता येतील. फक्त (Adventures Park) बॉर्डर पार करून एवढे पैसे भरा.. पाहा हा थ्रिलिंग VIDEO

नवी दिल्ली,06 जुलै : सुपर हिरो प्रमाणे हवेमध्ये स्टंट (Stunts) करायचा आहे किंवा पाण्यावर चालून त्याचा व्हिडिओ (Video) बनवून फेमस व्हायचं असेल तर, फक्त विमानाने प्रवास करायचा आहे. काही तासांच्या प्रवासानंतर तुम्ही हा अनुभव घेण्यासाठी सज्ज असाल. तर चीन (China) मधला Xiatianxia टूरिस्ट एरिया, Fujian प्रांतातलं एक प्रसिद्धा टूरिस्ट प्लेस (Tourist Place) तुमची वाट बघत आहे. या ठिकाणी आपल्याला लांबून पाहिल्यानंतरच काहीतरी चमत्कार घडतो असं वाटायला लागतं.

साऊथ चायना इन मॉर्निंग पोस्टने (SCMP) या एक्सपेरीमेंट्सचा आनंद घेणाऱ्या लोकांचा एक व्हीडिओ पोस्ट केलेला आहे. या व्हीडिओमध्ये काही टुरिस्ट (Tourist) नदीवर चालताना दिसतात तर, काही सुपरहिरो (Superhero) प्रमाणे हवेतच उडतात. या स्पेशल एडवेंचरसाठी (Special Adventures) फक्त दोन तारांच्या सहाय्याने त्या व्यक्तीला हवेत उचललं जातं.

(जगातली सर्वांत वृद्ध हत्तीण आजारी;100 पार केलेली वत्सला कुठे आहे, काय झालंय तिला)

यातली एक तार त्या व्यक्तीच्या कमरेला बांधलेली असते तिच्या सहाय्याने ऍडव्हेंचरचा आनंद घेणारी ती व्यक्ती पाण्यावर चालू शकते किंवा हवेमध्ये उडत हातामधली हत्यारं हवेत फिरवत एखादा स्टंट करू शकते.

(बापरे! आता आधीच कळेल मृत्यूची तारीख, मरणाची भविष्यवाणी करणारं कॅलक्यूलेटर)

या तारांची लांबी 600 मीटर  म्हणजे जमिनीपासून 20  मीटर उंचीपर्यंत या तारांच्या साहाय्याने जाता येतं आत्तापर्यंत या व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळालेले आहेत. सिनेमातील स्टंटची थिम लक्षात घेऊनच हा स्पोर्ट्स पार्क बनवण्यात आलेला आहे. जसं हिरो किंवा हिरोईन हवेमध्ये स्टंट करतात त्याच प्रकारे या पार्कमध्ये अनुभव घेता येतो. या एडवेंचर पार्कच तिकीट 128 युआन म्हणजेच 1500 रुपये आहे.

या तिकीटामध्येच गेम्स प्रॉप्स, मेकअप आणि हेअर स्टायलिंग सुद्धा मिळते. तर चीनला नक्की भेट द्या. कोरोनामुळे जागतिक पर्यटनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी असे व्हीडिओ केला जातात. तसंतर चीनमध्ये अनेक ऍडव्हेंचर पार्क आहेत. पण, या पार्कची थिम थोडी वेगळी आहे.

First published:
top videos

    Tags: Sports, World news