आता सोशल मीडियाच्या वापराने वाढू शकतो तरुणांचा कॉन्फिडन्स Social Media | Social Media Use | Social Media Benefits | Social Media Side- Effects

आता सोशल मीडियाच्या वापराने वाढू शकतो तरुणांचा कॉन्फिडन्स Social Media | Social Media Use | Social Media Benefits | Social Media Side- Effects

Social Media | Social Media Use | Social Media Benefits | Social Media Side- Effects सोशल मीडियाच्या वापराचे किती दुष्परिणाम आहेत हे दररोज नवनव्या पद्धतीने सांगितले जाते. पण सोशल मीडियाचे स्वतःचे असे काही फायदे आहेत.

  • Share this:

मुंबई, 28 जून : सोशल मीडियाचा वापर हा आता वैयक्तिक पातळीवर राहिला नसून अनेक क्षेत्रांमध्ये याचा वापर सर्रास केला जात आहे. सोशल मीडियाच्या वापरासाठी वयाचं कोणतीही मर्यादा नाहीये. त्यामुळेच छोट्यांपासून ते अगदी थोरा- मोठ्यांपर्यंत सगळेच सोशल मीडियावर सक्रिय असतात. पण अनेकदा या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहण्यापेक्षा नकारात्मकतेनेच पाहिलं जातं. सोशल मीडियाच्या वापराचे किती दुष्परिणाम आहेत हे दररोज नवनव्या पद्धतीने सांगितले जाते. एवढंच नाही तर, अतीवापरामुळे आरोग्यावर या सर्वांचा कसा वाईट परिणाम होतो हे ही सांगितलं जातं. यात चुकीचं असं काहीच नाही. पण प्रत्येक गोष्टीला जशा दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे सोशल मीडियाचे स्वतःचे असे काही फायदे आहेत.

सोशल मीडियाचा वापर मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं एका अभ्यासात समोर आले आहे. तरुणांमधील मनोबल वाढण्यासाठी सोशल मीडियाची मदच होते. तरुणाईमध्ये असलेलं नैराश्य, सततची चिंता आणि उदासिनता यांसारख्या मानसिक आजारावर उपाय म्हणून सध्या सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. हे वाचायला थोडं विचित्रं वाटत असलं तरी, अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीने यावर अभ्यास केला आहे. युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासानुसार, सोशल मीडिया आणि तंत्रज्ञान यांचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे मानसिक आरोग्याशी संबंधीत समस्या आणि लांब राहणाऱ्या मित्र-परिवाराशी नेहमी टचमध्ये राहण्यासाठी तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा चांगला उपयोग होतो.

पावसाळ्यात दूर ठेवा 'हे' आजार; करा घरगुती उपाय

'सोशल मीडियाचा वापर आणि त्याचा रोजच्या जीवनावर होणारा परिणाम यांवर आतापर्यंत अभ्यास केला गेला होता. पण, आम्ही केलेल्या अभ्यासाचा केंद्रबिंदू है सोशल मीडियाचा वापर आणि त्याचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम यावर आहे.' अशी माहिती मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटच्या प्राध्यापक किथ हॅम्प्टन यांनी दिली. 'सोशल मीडियाचा वापराने काहीजण नैराश्यग्रस्त होतात. अशा मोजक्या लोकांमुळे संपूर्ण पिढी धोक्यात असल्याचं सांगितलं जातं. माध्यमंही याच्या इतर फायद्यांकडे दुर्लक्ष करतात. ज्या घरांमध्ये एकच मुल असतं, ती मुलं सोशल माध्यमांचा आधार घेतात आणि लोकांशी संवाद साधून एकटेपणा दूर करतात.' अशी माहिती प्राध्यापक हॅम्प्टन यांनी दिली.

कामावर जाणारे पालक आणि घरी एकटी असणारी मुलं संवादाच्या अभावांमुळे अनेकदा एकटेपणा, उदासिनता अशा समस्येला तोंड देतात. अशावेळी त्यांना गरज असते ती संवादाची आणि लोकांची. सोशल मीडियाच्या मदतीने ही अडचण दूर होते.

'हा' आहे जगातला शेवटचा महामार्ग; या मार्गावर एकट्याने फिरण्यास आहे बंदी

वर्ष 2015 ते 2016 या कालावधीत तरुणांमधील 13 हजारांपेक्षा जास्त रिलेशनेशिपचा अभ्यास करण्यात आला. यात समोर आलेल्या अभ्यासानुसार जे लोक सोशल मीडियाचा वापर करतात त्यांमधील गंभीर मानसिक आजारांचं प्रमाण 63 टक्क्य़ांपेक्षा कमी आढळलं. यामध्ये नैराश्य, उदासिनता अशा गंभीर मानसिक आजारांचा अभ्यास करण्यात आला होता. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या लोकांमध्ये मानसिक आजारांचं प्रमाण कमी आहे असं एका अभ्यासात समोर आलं.

गच्चीतून पडलेल्या चिमुकलीसाठी 'तो' ठरला देवदूत; VIDEO VIRAL

First Published: Jun 28, 2019 06:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading