मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Health Tips: सावधान! उशीचा चुकीचा वापर देतो गंभीर आजारांना निमंत्रण, समजून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

Health Tips: सावधान! उशीचा चुकीचा वापर देतो गंभीर आजारांना निमंत्रण, समजून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

Health Tips: सावधान! उशीचा चुकीचा वापर देतो गंभीर आजारांना निमंत्रण, समजून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

Health Tips: सावधान! उशीचा चुकीचा वापर देतो गंभीर आजारांना निमंत्रण, समजून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

Advantages and disadvantages of using a pillow: उशी घेऊन झोपणं शरीरासाठी योग्य नाही, असं म्हटलं जातं. तुम्हीही अनेकदा ऐकलंच असेल पण उशी घेऊन झोपण्याचे तोटे आहेत, तसेच त्याचे फायदेही आहेत.

मुंबई, 18 ऑगस्ट:  प्रत्येकाच्या झोपण्याच्या  सवयी वेगळ्या असतात. काहींना शरीर सरळ रेषेत ठेवून झोपायची सवय असते, तर काही जण आडवे-तिडवे झोपतात, काहींना उशी (Use of Pillow while sleeping) लागते, तर काही विनाउशीचे झोपतात. खरंतर, उशी घेऊन झोपणं शरीरासाठी योग्य नाही, असं म्हटलं जातं. तुम्हीही अनेकदा ऐकलंच असेल पण उशी घेऊन झोपण्याचे तोटे आहेत, तसेच त्याचे फायदेही आहेत.
उशी घेऊन झोप घेतल्यानं शरीराला होणारे फायदे आणि नुकसान याबद्दल फिजिओथेरपिस्ट ख्याती शर्मा यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. शर्मा यांच्यामते, उशी नेक लाइनला अलाइन करण्यास मदत करते, पण त्यासाठी तुमची झोपण्याची पोझिशन योग्य असायला हवी. तसंच पोटावर झोपताना उशीचा वापर करू नये. शिवाय सरळ झोपताना आणि कुशीवर झोपताना उशीचा वापर करायला हवा, असा सल्लाही त्या देतात.
उशीशिवाय झोपण्याचे फायदे:
1. पाठदुखीमध्ये आराम-
उशी घेऊन झोपल्याने पाठीचा कणा हळूहळू तिरपा होऊ लागतो, त्यामुळे कंबरेत दुखणं सुरू होतं. तसंच उशीशिवाय झोपल्याने मान आणि पाठीचा कणा योग्य स्थितीत राहतो, त्यामुळे कंबर दुखत नाही.
2. मुरुमांपासून आराम-
रात्री झोपताना चेहरा 7-8 तास उशीच्या संपर्कात राहतो. त्यावेळी उशीवर साचलेली घाण चेहऱ्यावर चिकटून राहते आणि त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ आणि मुरुम येऊ शकतात. तुम्ही उशीचा अभ्रा दर तीन ते चार दिवसांनी धुतला नाही, तर तोंडातील लाळ, घाम आणि धूळ यामुळे उशीवर बॅक्टेरिया साचतात आणि चेहरा त्याच्या संपर्कात आल्याने पिंपल्सचा त्रास होऊ शकतो.
3. डिप्रेशन आणि तणाव दूर करते-
चांगल्या क्वालिटीची उशी वापरल्याशिवाय काही जणांना रात्री चांगली झोप येत नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशी त्यांना खूप चिडचिड आणि तणाव जाणवतो.
4. दिवसभर फ्रेश राहाल-
8-10 तासांची चांगली झोप आपल्याला मेंटली फ्रेश (Fresh) ठेवते, त्यामुळे थकवा जाणवत नाही. पण काही वेळा उशी बारीक किंवा जाड असेल तर नीट झोप येत नाही, त्यामुळे चिडचिड होते. म्हणून झोपताना उशी वापरू नये.
5. डोकेदुखीपासून सुटका
उशी घेऊन झोपल्याने डोक्याला ऑक्सिजनचा (Oxygen) पुरवठा कमी होतो आणि ब्लड सर्कुलेशन योग्यरित्या होत नाही. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर व्यक्तीला डोक्यात हलकासा त्रास जाणवतो. त्याउलट जर तुम्ही उशीशिवाय झोपत असाल तर डोक्यात ब्लड सर्कुलेशन (Blood Circulation) योग्य झाल्यामुळे डोकेदुखीचा त्रास होत नाही.
पायांमध्ये उशी ठेवून झोपणं-
दिवसभर व्यग्र राहिल्यानंतर रात्री शांत झोप घेणं आवश्यक आहे. चांगल्या झोपेसाठी झोपण्याची पद्धत योग्य असावी. शरीराच्या कोणत्याही भागावर दबाव पडणार नाही, असं झोपा. तसंच रात्रीच्यावेळी दोन्ही पायांमध्ये म्हणजे गुडघ्यांमध्ये किंवा मांड्यांमध्ये उशी ठेवून एका कुशीवर झोपण्याची सवय लावली तर तुम्हालाही चांगली झोप येईल आणि अनेक समस्या दूर होतील.
पायांमध्ये उशी ठेवून झोपण्याचे फायदे
1. मसल पेन होत नाही-
नीट झोप येत नसेल, मनात विनाकारण चिंता असेल तर दोन्ही पायांमध्ये उशी ठेवून झोपावं. दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये उशी ठेवल्याने गुडघे एकमेकांना लागत नाहीत. शरीराची पोझिशन योग्य राहते, त्यामुळे स्नायूंमध्ये ताण येत नाही. जर तुम्हाला आधीच स्नायूंमध्ये तणाव जाणवत असेल त्यासाठी उशी वापरणं हा उत्तम पर्याय आहे.
2. पाठीचा कणा आणि कंबरदुखीपासून आराम-
पाठीचा कणा सर्व सरळ लांब नसतो, तर त्याला बाक असतो. धावपळीच्या जीवनात, लोकांना अनेक कारणांमुळे पाठीचा कणा आणि कंबरदुखीचा त्रास होतो. अशा परिस्थितीत झोपताना दोन्ही पायांमध्ये उशी ठेवून एका कुशीवर झोपल्यास कंबरेवर आणि पाठीच्या कण्यावर ताण येणार नाही.
3. गर्भवती महिलांसाठी झोपण्याची योग्य पद्धत-
गरोदरपणात (Pregnancy) दीर्घकाळ एकाच पोझिशनमध्ये झोपणं खूप अवघड असतं. दोन्ही मांड्यांमध्ये उशी ठेवून एका कुशीवर झोपल्याने मणक्यावर कमी ताण पडतो. यामुळे चांगली झोप येते आणि शरीराच्या कोणत्याही भागावर वजन नसल्याने कोणतंही नुकसान होत नाही.
4. उशी घेऊन झोपण्याच्या सवयीमुळे होतात अनेक आजार-
रात्री झोपताना लोकांना आरामदायी बेड आणि मऊ उशीची लागते. काहींनी तर उशीवर तोंड ठेवून पालथं झोपायची सवय असेल. अनेक जण एक नाही तर दोन उशा वापरतात. पण उशी घेऊन झोपल्याने पाठीच्या मणक्यास त्रास होतो, मान दुखू शकते, चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात आणि लहान मुलांच्या श्वासनलिकेवर परिणाम होण्याचा धोका असतो. तसंच खूप उंच किंवा कडक उशी वापरल्याने खांदे आणि मानेच्या स्नायूंवर ताण येतो, ज्यामुळे मान दुखते.
5. ब्लड सर्क्युलेशनमध्ये सुधारणा-
कधीकधी आपण झोपतो तेव्हा ब्लड सर्क्युलेशन थांबतं. आपली झोपण्याची पद्धत चुकली असेल तर ज्या रक्तवाहिनीतून हृदयापर्यंत रक्त जातं त्या रक्तवाहिनीवर ताण येतो आणि ब्लड सर्क्युलेशन समस्या निर्माण होतात. त्यामुळे पायांमध्ये उशी ठेवून झोपायला सुरुवात केली तर सकाळी उठल्यावर शरीराच्या कोणत्याही भागात वेदना किंवा ताण जाणवणार नाही.
पाठीच्या कण्याशी संबंधित समस्या
उंच उशी घेऊन झोपल्यास पाठीच्या कण्याशी संबंधित समस्या होऊ शकतात. उशी घेऊन झोपल्यास शरीराची पोझिशन बिघडते आणि पाठीच्या कण्याचं नुकसान होतं. पाठीच्या कण्याचा आकार बिघडून दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात.
लवकर येऊ शकतं म्हातारपण-
 जे लोक उशीमध्ये तोंड टाकून झोपतात, त्यांच्या त्वचेवर याचा वाईट परिणाम होतो. उशीच्या संपर्कात आल्याने चेहऱ्याची त्वचा ताणली जाते आणि त्यावर ताणही येतो. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात आणि सुरकुत्या हे म्हातारपणाचं लक्षण आहे.
मुलांना उशा का दिल्या जात नाहीत?
लहान मुलांना डोक्याखाली उशी दिल्याने त्यांच्यासाठी अनेक समस्या उद्भवू शकतात. लहान मुलांना उशी दिल्याने त्यांची श्वसननलिका मुडपली जाण्याचा आणि बंद होण्याचा धोका असतो.
First published:

Tags: Health Tips, Sleep

पुढील बातम्या