Home /News /lifestyle /

Skin Care : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 4 गोष्टी, त्वचा राहील मुलायम

Skin Care : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 4 गोष्टी, त्वचा राहील मुलायम

How To Prepare Bathing Water For Skin Care: अंघोळीच्या पाण्यात फ्रेशनेससोबतच त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी काही वस्तू मिसळल्यास त्वचेशी संबंधित समस्याही दूर होतील. या वस्तू तुमच्या त्वचेची काळजी तर घेतीलच, शिवाय हिवाळ्यातील कोरडेपणाही दूर करतील.

पुढे वाचा ...
    मुंबई, 15 डिसेंबर : आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी आणि मन ताजंतवानं राहण्यासाठी आंघोळ (Bath) किती महत्त्वाची आहे, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु, तुम्हाला नेहमीच्या पद्धतीनं आंघोळ करण्याचा कंटाळा आला असाल आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नसेल तर, काही सोप्या टिप्सच्या मदतीनं तुम्ही तुमची रोजची अंघोळ (How To Prepare Bathing Water For Skin Care) खास बनवू शकता. अंघोळीच्या पाण्यात फ्रेशनेससोबतच त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी काही वस्तू मिसळल्यास त्वचेशी संबंधित समस्याही दूर होतील. या वस्तू तुमच्या त्वचेची काळजी तर घेतीलच, शिवाय हिवाळ्यातील कोरडेपणाही दूर करतील. शिवाय, त्यांचा सुगंध तुम्हाला ताजंतवानं ठेवेल आणि आंघोळ केल्यावर तुम्हाला आणखी बरं वाटेल. यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही हे करू शकता. चला, जाणून घेऊ पाण्यात कोणत्या नैसर्गिक वस्तू मिसळून आंघोळ करणं फायदेशीर आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात या वस्तू घाला 1. तुरटी आणि खडेमीठ किंवा सैंधव आंघोळ करताना कोमट पाण्यात खडेमीठ/सैंधव आणि तुरटी मिसळा. या पाण्यानं अंघोळ केल्यानं थकवा दूर होतो आणि शरीरातील रक्ताभिसरणही चांगलं होतं. यासोबतच स्नायूंनाही आराम मिळतो. यामुळे त्वचा तजेलदार आणि चमकदार दिसते. 2.बेकिंग सोडा तुमच्या अंगावर पुरळ, मुरूम किंवा तारुण्य पिटिका असल्यास, आंघोळ करताना पाण्यात 5 चमचे बेकिंग सोडा मिसळा. त्यानंतर या पाण्यानं आंघोळ करावी. असं केल्यानं शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि आजार होण्याची शक्यता कमी होते. हे वाचा - MHADA paper leak: म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी खास कोडवर्ड, “घरातले सामान कधी मिळणार?” 3.ग्रीन टी चमकदार त्वचेसाठी, आंघोळीपूर्वी 15-20 मिनिटे आंघोळीच्या पाण्यात 4 ते 5 ग्रीन टी बॅग टाकून ठेवा. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि डिटॉक्सिफायर (विषारी पदार्थ दूर करणारे) गुणधर्म असतात, जे त्वचेसाठी अँटी-एजिंग आणि क्लिन्झर म्हणून काम करतात. हे वाचा - Healthy Breakfast: सकाळी नाश्त्यामध्ये या गोष्टी खाणं आहे फायदेशीर; अनेक आजार राहतील दूर 4. कडुलिंबाची पानं तुमच्या त्वचेवर अ‌ॅलर्जी, मुरुम, तारुण्य पिटिकांची समस्या असेल तर आंघोळीसाठी 8 ते 10 कडुलिंबाच्या पानांचा वापर करणं फायदेशीर ठरेल. ही कडुनिंबाची पानं एक पेलाभर पाण्यात उकळून गाळून घ्या. हे पाणी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात मिसळा. या पाण्यानं आंघोळ केल्यास त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. (सूचना: या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beauty tips, Skin, Skin care

    पुढील बातम्या