जाणून घ्या, काय असतं अॅक्युप्रेशर थेरपी, पीएम मोदींनीही सांगितले याचे फायदे

जाणून घ्या, काय असतं अॅक्युप्रेशर थेरपी, पीएम मोदींनीही सांगितले याचे फायदे

काही दिवसांपूर्वी ममल्लापुरम बीचवर पंतप्रधान नरेंद्र मोदी फिरताचे काही फोटो व्हायरल झाले होते. या फोटोत सर्वांच लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे मोदींच्या हातातील एका वस्तूने.

  • Share this:

काही दिवसांपूर्वी ममल्लापुरम बीचवर पंतप्रधान नरेंद्र मोदी फिरताचे काही फोटो व्हायरल झाले होते. या फोटोत सर्वांच लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे मोदींच्या हातातील एका वस्तूने. विशेष म्हणजे मोदींनी स्वतः त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ती वस्तू काय आहे याची माहिती दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की हे अॅक्यूप्रेशर रोलर आहे. आपल्या निरोगी आरोग्यासाठी ते याचा अनेकदा वापर करतात. आज आपण जाणून घेऊ की अॅक्यूप्रेशरची एवढी चर्चा का होतेय ते नेमकी आहे तरी काय...

अॅक्युप्रेशर ही एक प्रकारची थेरपी आहे. यात लोकांना वेदनांपासून आराम मिळतो. अ‍ॅक्युप्रेशर थेरपीमध्ये मानवी शरीरात असलेल्या प्रेशर पॉईन्टवर बोटांनी किंवा विशिष्ट अशा उपकरणाने दाब दिला जातो. या दबावामुळे न्यूरॉनमधील ताण कमी होतो आणि शरीराला आराम मिळतो.

अॅक्युप्रेशरचे फायदे-

अॅक्युप्रेशरचा वापर केल्याने शरीराला अनेक मार्गाने फायदा होतो. काही आजारांमध्ये तर अॅक्युप्रेशरचा वापर अगदी महत्त्वाचा मानला जातो. उदाहरण द्यायचे झाले तर, मनगटावर करण्यात आलेल्या अॅक्युप्रेशरने उल्टी आणि चक्कर यांसारख्या आजारांवर त्वरीत आराम मिळतो. यासोबतच सर्जरीनंतर हाडांमध्ये दिला जाणारा एनेस्थिशियाचा डोस, मोशन सिकनेस, गरोदरपणातील काळ आणि केमोथेरपीनंतरही अॅक्युप्रेशर थेरपी घेण्याचा सल्ला दिला जातो.

अॅक्युप्रेशर पॉइन्ट-

संपूर्ण शरीरात अॅक्युप्रेशरचे 100 हून जास्त पॉइन्ट आहेत. हे पॉइन्ट शरीराला आराम देण्याचं काम करतात. विशेष म्हणजे या पॉइन्टची अनेक नावंही आहेत. पण आज आम्ही अशा नावांबद्दल सांगणार आहोत ज्याबद्दल अॅक्युप्रेशरचे तज्ज्ञ अधिक बोलताना दिसतात. पहिलं आहे लार्ज इन्टेस्टाइन 4. हा पॉइन्ट हाताचा अंगठा आणि तर्जनीच्या (अंगठ्या बाजूचं बोट) मध्ये असतो. दुसरा आहे लीवर 3. याचा पॉइन्ट पायाच्या वरील भागात अंगठा आणि बाजूच्या बोटाच्यामध्ये असतो. तिसरा पॉइन्ट टाचेच्या साधारण तीन बोट वर असतो. हे तीन प्रेशर पॉइन्ट सर्वात जास्त वापरले जातात.

Global Handwashing Day 2019: हात धूणं खरंच तेवढं महत्त्वाचं आहे का?

जास्त बाइक चालवण्याने होऊ शकतो हा गंभीर आजार, जाणून घ्या याची लक्षणं आणि उपाय

ATM मशीनमधून पैसे निघाले नाहीत म्हणून चोरांनी चक्क आणला JCB, पाहा हा Viral Video

आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर या 7 गोष्टी नक्की करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 05:47 PM IST

ताज्या बातम्या