मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सारा- जान्हवीच्या हॉट वर्कआउटने वाढवलं इंटरनेटचं तापमान

सारा- जान्हवीच्या हॉट वर्कआउटने वाढवलं इंटरनेटचं तापमान

सारा आणि जान्हवीच्या व्यायामाचा एक व्हिडीओ (exercise video) समोर आला आहे. ज्यात त्या एकमेकींसोबत व्यायाम करत आहेत.

सारा आणि जान्हवीच्या व्यायामाचा एक व्हिडीओ (exercise video) समोर आला आहे. ज्यात त्या एकमेकींसोबत व्यायाम करत आहेत.

सारा आणि जान्हवीच्या व्यायामाचा एक व्हिडीओ (exercise video) समोर आला आहे. ज्यात त्या एकमेकींसोबत व्यायाम करत आहेत.

  • Published by:  News Digital

मुंबई, 26 एप्रिल : बॉलिवूडच्या (Bollywood actresses)  नवतारका सारा आणि जान्हवी म्हणजेच अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) निरनिराळ्या कारणांसाठी चर्चेत असतात. नुकताच त्यांच्या व्यायामाचा एक व्हिडीओ (exercise video) समोर आला आहे. ज्यात त्या एकमेकींसोबत व्यायाम करत आहेत. इतकच नव्हे तर एकमेकिंसोबत रमत गमत त्या व्यायाम करत आहेत. तर काही मिनिटांतच या व्हिडिओने इंटरनेटवर अनेक लाइक्स आणि कंमेट्स मिळवल्या आहेत.

सारा आणि जान्हवी दोघीही फिटनेसच्या बाबतीत अतिशय सतर्क आहेत. त्या न चुकता त्यांचं वर्कआउट रूटीन (workout) करतात. नेहमीच त्या आपल्या फिटनेस सेंटर मध्ये जाताना दिसतात. आता कोरोना काळात फिटनेस क्लब बंद असले तरी त्यांच्या या VIDEO ची चर्चा आहे. विशेष म्हणजे दोघिंचीही फिटनेस ट्रेनर एकच आहे. त्यामुळेच त्या दोघी एकत्र व्यायाम करत आहेत.

सारा ने तिच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावर त्या दोघींच्याही चाहत्यांनी त्यांना भरभरून कमेंट्स दिल्या आहेत. तर काहींनी दोघींचं कौतुकही केलं आहे.

सारा तिच्या सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. नेहमीच निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. नुकतीच तिने तिच्या आईसोबत म्हणजेच अमृता सिंग (Amrita Singh) सोबत काश्मिर ट्रिप केली होती. त्याचे अनेक व्हिडीओस आणि फोटोज तिने शेअर केले होते.

तर दुसरीकडे जान्हवी नुकतीच मालदीव ट्रिपहून परतली आहे.

हे वाचा - बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी काय करावं? रणवीर सिंगनं दिला कानमंत्र

सारा तिचा आगामी चित्रपट ‘अतरंगी रे’ (Atrangi re)  मध्ये झळकणार आहे तर जान्हवी ‘दोस्ताना 2’ (Dostana 2)  या धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटात दिसणार आहे.

First published:

Tags: Bollywood News, Janhvi kapoor, Sara ali khan