मुंबई, 16 जानेवारी: सध्याच्या काळात सोशल मीडिया (social media) हे एक असं माध्यम आहे. जिथे तुम्हाला मोकळेपणाने तुमची मतं (opinion) मांडता येतात. तसेच फोटो अपलोड करता येतात. असं असलं तरी काही वेळा नेटकऱ्यांच्या टीकेचा (trolling) धनी व्हाव लागतं.असंच काहीसं अभिनेत्री रजनी चांडीच्या (Rajini Chandy) बाबतीत सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. 69 वर्षीय रजनी चांडी जीन्स (Jeans) घातलेले फोटो बरेच व्हायरल (Viral photo) होताना दिसत आहेत.
अलिकडेच रजनी चांडी यांनी फोटोशूट केलं असून ते फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. त्यांनी या फोटोत जीन्स घातली आहे. 69 वर्षाच्या रजनीचा कडक लुक काही लोकांच्या पचनी पडत नाहीये. त्यामुळे काही लोकं रजनीला ट्रोल करताना दिसत आहे. पंरतु बहुतांशी लोकांनी रजनीच्या या नव्या लुकचं भरभरून कौतुक केलं आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
वयाच्या 69 व्या वर्षी रजनी यांनी जीन्स परिधान केल्याने काही लोकांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. काही जणांनी त्यांच्या पोस्टखाली हसणाऱ्या इमोजी कमेंट केल्या आहेत, तर काहींनी त्यांना काकू म्हणून संबोधलं आहे. शिवाय काही लोकांनी तर संतप्त इमोजी देखील कमेंट केला आहे. पण बऱ्याच लोकांना रजनीचा जीन्समधला लुक लेडी जेम्सस बाँडची आठवण करून देत आहे. एका व्यक्तीनं म्हटलं की त्या नफीजा अलीसारख्या दिसत आहेत. तर एका 74 वर्षीय महिलेनं रजनीच्या सौंदर्याचं कौतुक करताना म्हटलं की, ती खुप सुंदर दिसतं असून आम्हाला तुझा तुझा अभिमान आहे. काही कमेंट्स सोडल्या तर संपूर्ण कमेंट बॉक्स रजनीच्या कौतुकाने भरलेला दिसत आहे.
View this post on Instagram
इंडिया टुडेशी बोलताना रजनीनं सांगितलं की, 'लोकं माझ्याबद्दल काय विचार करतात याचा मी विचारही करत नाही. प्रत्येक वेळी जेव्हा कोणी फोटोशूटबद्दल विचारतं तेव्हा मात्र मी अस्वस्थ होते. लोकं ज्या प्रकारे कमेंट्स करत आहेत, ते पाहणं वेदनादायक आहे. खरंतर अपशब्द वापरणारी लोकं मला ओळखतही नाहीत. मी असं काय चुकीचं केलं, ज्यामुळं लोकं माझ्याशी असं वागत आहेत, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actress