Home /News /lifestyle /

हरभजन सिंगची बायको गरोदर असतानाही करतेय योगा; सांगितले या आसनांचे फायदे

हरभजन सिंगची बायको गरोदर असतानाही करतेय योगा; सांगितले या आसनांचे फायदे

क्रिकेटर हरभजन सिंगची (Harbhajan Singh wife) पत्नी अभिनेत्री गीता बसरा (geeta basra) दुसऱ्यांदा आई होणार आहे.

  मुंबई, 6 एप्रिल : अभिनेत्री नेहमीच स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. मग ते अगदी गर्भवती असताना देखील.  अनुष्का शर्मा प्रेग्नंट असताना शीर्षासन करत असतानाचा फोटो व्हायरल झाला होता. आता अभिनेत्री गीता बसरा (Geeta Basra) हीदेखील गरोदर असताना योगासनं करताना दिसत आहे. गीता म्हणजे क्रिकेटर हरभजन सिंगची (Harbhajan Singh) बायको. ती दुसऱ्यांदा आई होणार आहे. सोशल मीडियावरून त्यांनी ही माहिती तिने चाहत्यांना दिली होती. आता गीताचे योगासनांचे (yoga poses) फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.
  View this post on Instagram

  A post shared by Geeta Basra (@geetabasra)

  2015 मध्ये गीता आणि हरभजन सिंग या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर 2016 मध्ये गीत पहिल्यांदा आई झाली. हरभजन आणि गीता यांना हीर (Heer) नावाची मुलगी आहे. तर गीता आता पुन्हा एकदा आई होत आहे. प्रेग्नन्सीमध्ये योगसाधना करणं आता काही नवं नाही. याआधी अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor), अनुष्का शर्मा (Anushka sharma), लिझा हेडन (lisa haydon) यांनीही गर्भवती असताना अवघड  योगा पोझ देत फोटोशूट केलं होत. तर आता गीतानेही काही आसनं केली आहेत. अर्थात ही आसनं आरोग्यासाठी आणि बाळाच्या प्रकृतीसाठीही उत्तम असतात. पण ती प्रशिक्षकांच्या सल्ल्यानुसार करणंच योग्य.
  View this post on Instagram

  A post shared by Geeta Basra (@geetabasra)

  इंडिया टुडे (India today) ने दिलेल्या वृत्तानुसार गीताला गरोदरपणात योगाचा फार उपयोग झाल्याचं तिने सांगितलं. “या कोरोना काळात शारीरिक कष्ट फारच कमी झाले होते. या साथीच्या काळात गर्भवतींनी जीमला जाणंही योग्य नाही. पण योगाने मला फार मदत केली. माझ्या योग गुरूंच्या निरीक्षणाखाली मी ही सगळी आसनं केली. ज्या महिला गर्भवती नाहीत त्यांनी देखील योगा करायला हवा. पण योग्य गुरूंच्या सल्ल्यानेच.” असं गीता म्हणाली.

  'लोका सांगे ब्रह्मज्ञान अन् आपण...'; मास्कविना फिरणाऱ्या कंगनाला अभिनेत्यानं सुनावले खडे बोल

  गीता ही अभिनेत्री असून तिने काही चित्रपटांत काम केलं आहे. पण सध्या गीता ही चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. तर संपूर्ण वेळ ती कुटुंबाला वेळ देत आहे. दिल दिया है, द ट्रेन, जिला गाझियाबाद, लॉक अशा चित्रपटांमध्ये ती दिसली होती.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Bollywood actress, Sports

  पुढील बातम्या