मुंबई, 13 जानेवारी : सेलिब्रिटीजच्या (Celebrities) वैयक्तिक आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता असते. अनेक सेलिब्रिटीज सोशल मिडीयाच्या (Social Media) माध्यमातून आपल्या चाहत्यांसाठी वैयक्तिक आयुष्यातील घटना, गोष्टी शेअर करत असतात. सध्या सेलिब्रिटीजची लहान मुले हा चाहत्यांच्या आकर्षणाचा विशेष केंद्रबिंदू ठरताना दिसतो. सोशल मिडीयावर या मुलांचे फोटो, व्हिडीओला विशेष पसंती मिळताना दिसते. त्यामुळे असे फोटो मिळवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी छायाचित्रकार (Paparazzi) विशेष प्रयत्न करताना दिसून येतात.
या पार्श्वभूमीवर, कृपया आमच्या नवजात बाळाचे (मुलीचे) फोटो काढू नका, अशी विनंती अभिनेत्री-निर्माती अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि तिचा पती, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांनी फोटोग्राफर्सला बुधवारी येथे केली. आपल्या नव्या बाळाच्या आगमनाची घोषणा विराट कोहलीने 11 जानेवारीला केली होती. यावेळी बाळ आणि बाळाची आई सुखरुप असल्याचेही त्याने सांगितले होते.
आमच्या बाळाच्या खासगी आयुष्याचा सन्मान करा, अशी विनंती करणारे पत्र या दांपत्याने पापाराझ्झींना लिहीले आहे. तुम्ही आमच्या बाळावर जो प्रेमाचा वर्षाव केलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत, अशी कृतज्ञता अनुष्का आणि विराटने यावेळी व्यक्त केली आहे.
एक पालक म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की आम्हाला आमच्या बाळाच्या खासगी आयुष्याचे रक्षण करायचे आहे आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची आणि समर्थनाची नितांत गरज असल्याचे या दांपत्याने पत्रात म्हटले आहे. आम्ही योग्यवेळी तुम्हाला कण्टेंट उपलब्ध करुन देऊ अशी हमी या दांपत्याने छायाचित्रकारांना दिली. आमच्यावरील चित्रणाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला नक्कीच पुरवू. त्यामुळे सध्या तुम्ही आमच्या बाळाच्या अनुषंगाने असलेला कोणाताही कण्टेंट घेऊ नये. आम्ही कोणत्या परिस्थितीतून बाहेर पडलो आहोत, हे तुम्हाला लवकरच समजेल. मात्र त्यासाठी आम्ही तुमचे आभार मानतो. 32 वर्षीय अनुष्का आणि विराट यांनी नुकताच लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला आहे.
एका जाहिरातीच्या सेटवर या दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. लग्नापूर्वी सुमारे चार वर्षे हे दोघे डेट करत होते. 11 डिसेंबर 2017 ला इटली येथे एका खासगी समारंभ ते अनुष्का आणि विराट विवाहबध्द झाले. गतवर्षी ऑगस्टमध्ये अनुष्का शर्मा हिने प्रेग्नंट असल्याची घोषणा केली होती.