नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी: पेट्रोल आणि डिजेलच्या किमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सामान्य नागरिक या दरवाढीने त्रस्त झाले आहेत. चहुबाजूने सरकारवर टीका होत असून सोशल मीडियावर ट्वीट, मिम्स, पोस्टर द्वारे लोक याचा निषेध करत आहे. नुकतेच काही सेलिब्रेटी सुद्धा या दरवाढीविरोधात बोलताना दिसून आले आहेत. ‘ रंग दे बसंती’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थने सुद्धा यावर ट्वीट करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टोला लगावला आहे.
अभिनेता सिद्धार्थ हा आपल्या रोकठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रख्यात वकील प्रशांत भूषण यांनी निर्मला सीतारामन यांच्या पेट्रोल दरवाढीविरोधात दोन वक्तव्यांची तुलना करणारा व्हिडीओ शेअर केला होता. यात 2013 मध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार होत तेव्हा त्यांनी दरवाढीसाठी सरकारला जबाबदार धरलं होत आणि आता त्यांनी पेट्रोलच्या वाढत्या किमतीसाठी तेल कंपन्यांना जबाबदार सांगितले आहे.
Maami is next level flexible in her belief system. No onions, no memory, no principles. Maami rocks! https://t.co/4WZ791m1HV
— Siddharth (@Actor_Siddharth) February 22, 2021
प्रशांत भूषण यांच्या या व्हिडीओ ट्वीट वर सिद्धार्थने प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धार्थ लिहितात, ‘ मामी ज्यावर विश्वास ठेवते, त्यानुसार स्वतःला बदलून घेते. मग कुठली स्मरणशक्ती नाही, सिद्धांत नाही. मामी रॉक्स!’
अवश्य वाचा - Tiktok stars: तुमचे लाडके टिकटॉक स्टार ज्यांनी नैराश्यातून संपवलं जीवन
सिद्धार्थचे साउथ फिल्म इंडस्ट्री मध्ये जास्त सक्रीय आहे. त्याचे आगामी चित्रपट इंडियन 2, नवरस आणि महासमुद्रम आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nirmala Sitharaman, Petrol and diesel price, Petrol Diesel hike, Union Finance Minister