• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • Chanakya Niti: दोन तर्‍हेचे लोक आयुष्यभर राहतात दुःखी; कधीच मिळत नाही यश

Chanakya Niti: दोन तर्‍हेचे लोक आयुष्यभर राहतात दुःखी; कधीच मिळत नाही यश

चाणक्य यांनी सांगितलेल्या नीति आजही जीवन जगतांना उपयोगात येतात.

चाणक्य यांनी सांगितलेल्या नीति आजही जीवन जगतांना उपयोगात येतात.

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी सांगितलेल्या नीतिनुसार (Niti) 2 तऱ्हेच्या लोकांना त्यांच्या कर्माने केवळ दुःख मिळत राहतं.

  • Share this:
    दिल्ली ,23 जून:चाणक्य (Chanakya) हे एक कुशल राजकारणी,चतुर मुत्सद्दी,कुटनिती तज्ज्ञ,अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य (Kautilya) म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या नीति  कठीण काळामध्ये (Difficult Time)व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात.चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी (Bad Things)ओळखण्याची क्षमता(Capacity)येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही (peaceful life)जगता येतं.त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. खरोखरच सुखी, संपन्न, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर चाणक्यनीति नुसार आयुष्य जगा. चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलं आहे. आयुष्यात येणारी आर्थिक संकटं, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री, शत्रु या सगळ्यांबद्दल आचार्य चाणक्य यांनी काहीनाकाही भाकीतं करून ठेवलेली आहेत. (कोणावरही विश्वास ठेवताना या 3 गोष्टींचा विचार करा; नाहीतर येईल पश्चातापाची वेळ) आचार्य चाणक्य यांच्या मते युष्यामध्ये दोन तर्‍हेचे लोक असतात ज्यांना कधीच यश मिळत नाही. जे विचार करता मात्र कृती करत नाहीत आणि जे विचार न करता कृती करतात. या दोन्ही पद्धतीचे लोक आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत. (गुरूच्या वक्रदृष्टीचे परिणाम; सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिकेला होणार त्रास) आचार्य चाणक्यंच्या मते आजूबाजूलाही असे लोक असतात जे अविचारी असतात. विचार न करतात आपल्या ध्येयाच्या मागे धावायचा प्रयत्न करतात. आचार्य चाणक्य सांगतात अशा प्रकारचे लोक अयशस्वी ठरतात. कारण त्यांची मेहनत योग्य दिशेने आणि योग्य मार्गाने जात नाही. ते लोक प्रचंड मेहनत करतात मात्र त्याला योग्य दिशा नसल्याने त्यांन यश येत नाही. त्यामुळे दुखी राहतात. (राशीभविष्य: सिंह राशीच्या व्यक्तींची होणार इच्छापूर्ती; मात्र या 3 राशींनी जपून) त्या उलट कृती केल्यावर विचार करणारे लोक नेहमी केलेल्या कामावर पश्चाताप करत राहतात. त्यामुळे आयुष्यात त्यांच्याहातून सगळ्या गोष्टी निसटून जातात. चाणक्यांच्या मते आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर, सगळ्यात आधी आपलं लक्ष ठेरवलं पाहिजे त्यानंतर रणनिती बनवायला पाहिजे. रणनिती बनवताना चांगले आणि वाईट परिणाम दोन्हीचाही विचार करायला पाहिजे. शिवाय हे लक्ष मिळवत असताना कोणत्या अडचणी येतील याची देखील माहिती घेतली पाहिजे. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
    Published by:News18 Desk
    First published: