दिल्ली, 4 जुलै:चाणक्य
(Chanakya) हे एक कुशल राजकारणी,चतुर मुत्सद्दी,कुटनिती तज्ज्ञ,अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचीत होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य
(Kautilya) म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य
(Acharya Chanakya) यांच्या नीति कठीण काळामध्ये
(Difficult Time)व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात.चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या
(Good) आणि वाईट गोष्टी
(Bad Things)ओळखण्याची क्षमता
(Capacity)येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही
(peaceful life)जगता येतं.
त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. खरोखरच सुखी, संपन्न, समाधानी आयुष्य जगायचं असेल तर चाणक्यनीति नुसार आयुष्य जगा.
चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी अनेक गोष्टींबद्दल वर्णन केलं आहे. आयुष्यात येणारी आर्थिक संकटं, वैवाहिक जीवन, नोकरी, व्यापार, मैत्री, शत्रु या सगळ्यांबद्दल आचार्य चाणक्य यांनी काहीनाकाही भाकीतं करून ठेवलेली आहेत.
(
Chanakya Niti: शत्रूंना नामोहम करण्याचा सोपा उपाय; गप्प होतील सगळे वैरी)
सकाळी उठा
आचार्य चाणक्य सांगतात की सकाळची वेळ बहुमुल्य असते. त्यामुळे प्रत्येत व्यक्तीने लवकर उठावं. ज्यांना वेळेच महत्व कळत नाही असे लोक लवकर उठत नाहीत अणि उशीरापर्यंत अंथरुणात लोळत पडतात. त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होत नाही. असे लोक नेहमी दरिद्री राहता.
स्वच्छता
शरीराच्या स्वच्छतेबरोबर दात आणि कपड्यांची साफसफाई करणं देखील खूप महत्वाचं आहे. जे नियमितपणे आंघोळ करत नाहीत,दात स्वच्छ करत नाहीत आणि अस्वच्छ कपडे घालतात त्यांच्यावर लक्ष्मी प्रसन्न होत नाही. अशा लोकांचं आयुष्य आजारपणात जातं. त्यांतच त्यांचे बरेच पैसे वाया जातात.
(
जुलै महिना आहे 7 राशींसाठी महत्त्वाचा; 4 ग्रहांच्या कृपेने बदणार आयुष्य)
वेळेवर जेवण
चाणक्य यांनी जेवणाला खूप महत्वाचं मानलं आहे. सुदृढ शरीरासाठी प्रत्येकाने वेळेवर जेवण करावं असं ते म्हणतात. जगण्यासाठी खाणं आवश्यक आहे, पण खाण्यासाठी जगू नका असंही ते सांगतात. ज्या लोकांचं मन खाणं आणि पैसे यात गुंतलेलं असतं त्यांच्या घरात पैसा टिकू शकत नाही.
(
Vastu Tips: भाग्य बदण्यासाठी घरात वापरा वेगवेगळे रंग, कौटूंबिक आयुष्य होईल सुखी)
गोड शब्द
आचार्यंच्यामते जगातील सगळी मोठी कामं गोड शब्दांनी होतात. गोड बोलणारे लोक सर्वांना प्रिय असतात. त्यांना सगळीकेड आदर मिळतो, संधी उपलब्ध होतात. त्याउलट कडू बोलणारे कोणालाच आवडत नाहीत. त्यांचे संबंध चांगले राहत नाहीत. लक्ष्मी यांच्या जवळ कधीच थांबत नाही.
(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.